पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ रेशन अगदीं मोडून गेले; पूर्वीची रीति बंद झाली; व ज्या किल्यांवर फ्रेंच फौज रखवालीस होती, ते एका मा गून एक स्वाधीन झाले. फ्रेंच फौज तेथें नसतां हालंड देशांतील राज्यांत लो- कांनी फेरफार केला. फ्रेंच यांचे ताबेदार आपण त्यांत आपली फार अपकीर्त्ति व व्यापाराची खरात्री आहे, असे समजून द्वेषानें फेब्रुअरी महिन्याचे सुमारें एक बंड झाले होतें, परंतु त्या बंडांतील लोकांचें शासन झाले, त्यामुळे तें प्रारंभींच मोडलें. शेवटीं फौजांचा जमाव हालंड देशाचे सीमेजवळ येऊ लागला, तेव्हां आम्स्टर्डम शहरचे लोक जमून त्यांस "आरेंजबोवन" असें ह्मणत. आरेंज निशाणे घे- ऊन त्यांनी त्या कीर्तिवंत कुटुंबाचा राज्याधिकार प्रसिद्ध केला, व त्यांची तीन गलबतें जाळलीं, व एक कामगारास ठार मारिलें. याप्रमाणेच पुढे हालंड देशांतील सर्व मुख्य श हरांनी केलें, व नवेंबर महिन्याचे २१ वे तारिखेस प्रिन्स आफ आरेंज यास आपणास मदतीस बोलावयाकरितां लंडन शहरांत वकील आले. ब्रिटिश राजाचे प्रधानां- नींही त्यांस जितकी मदत होईल तितकी करण्याची मस- लत ठरविली. पुढे त्या महिन्याचे ३० वे तारिखेस प्रि- न्स आफ आरेंज, स्किलिंग एथें जाऊन तेथून पुढे हेग शहरास गेला, तेथें त्यानें लोकांचे प्रार्थनेवरून सूटाट होल्डर किताव सोडून नेदर्लंड एथील राजा, असा किताब धरून राज्यकारभार चालवावयास आरंभ केला. चा एप्रिल महिन्याचे ११ वे तारिखेस डान फर्नांडो मिलर्स याचे हाताखालचे स्पानिश फौजेचे टोळीवर सुषे यानें हल्ला करून तीस हटवून विलेना एथील किला घेतला, त्या-