पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३ थील राजानें मोड केला; आणि पुढे काय करावें हें, बो- नापार्ट यास सुचेना, कारण कीं, तो बोहिमिया एथील मोठ्या फौजेशी लढाई करीत असतां, सिलिशिया एथील फौज ड्रेस्डन शहरावर चढून गेली; आणि तो त्या सि लिशियन फौजेवर येतांच मोठी फौज परत आली. शेवटीं फौजांचा जमाव वाढून आपले लश्कराचे पिछा- डीवर हल्ला करितो, आणि आपला पुरावा बंद झाला, असे पाहून बोनापार्ट आक्टोबर महिन्याचे ७ वे तारिखेस ड्रेस्डन एथून निघून लैप्सिक एथें चालला. त्यानें श हरांत रखवाली लोक ठेविले, व साक्सनी एथील राजा व्यास सोडून जमावांत मिळाला, व तीनही फौजा बोना- पार्ट यावर चालत्या झाल्या. या महिन्याचे १६ वे तारिखेस मार्शलने याची ब्लकर याशीं गांठ पडून याचा मोड झाला; त्याच दिसशीं लैप्- सिक याजवळ मोठे फौजेचे मध्यावर बोनापार्ट यानें जब- रदस्त हल्ला केला, परंतु त्याचा जय झाला नाहीं. नंतर त्या तीनही फौजांचा परस्पर करार ठरून १८ वे तारिखेस एक मोठी लढाई झाली; तींत बोनापार्ट याचा बहुत नाश झाला, आणि शत्रु शहरांत शिरण्याचे पूर्वी दोन तास तो मोठ्या संकटानें कैद करण्याचें चुकवून निघून गेला. मग फौजेचा जमाव मोठ्या समारंभानें शहरांत गेला; साक्स- नी एथील दरबारास कैद केलें; आणि चार लाख फौज लढाईच्या प्रारंभी होती, तींतून नव्वद हजार रैन नदी उ तरून सुरक्षितपणे परत गेली, तेव्हां जर्मनी एथील लहान राज्ये मोठे जमावास मिळू लागलीं, रैन एथील कन्फेड-