पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ वरून लढाई बंद झाली, आणि ४ थे तारिखेस लढाई बंद ४ होण्याचा करार होऊन, तो जुलै महिन्याचे २० वे तारि- खेपर्यंत राहावा असे केले. तो पुढे आगष्ट महिन्याचे म ध्यापर्यंत चालावा असे केले; परंतु बोनापार्ट यास अभि- मान व अविचार फार, त्यामुळे तहाची कोणती मसलत चालत नसे; आणि शेवटी त्याचे सासऱ्यानेही आपली फौज त्याचे शत्रूचे फौजेस मिळविली. आगष्ट महिन्याचे १७ वे तारिखेस पुनः लढाया चालू झाल्या; आणि बोनापार्ट बोहिमिया देशचे राजधानीवर लागलाच हल्ला करण्याच्या वेतांत होता; परंतु ब्रेस्ला एथून रुशियन व प्रशियन फौजेनें सिलिशिया एथील आपले लोकांवर हल्ला केला, असे ऐकून त्यानें तेथे जाऊन २१ वे तारिखेस तेथून शत्रूंस बाहेर काढून दिले. हे झा- ल्यावर लागलीच त्यास बातमी आली कीं, शत्रू आपणास एल्ब नदीवरून काढून देण्याकरितां ड्रेस्डन शहरावर ह- ला करणार आहेत; हें व्यास कळले तेव्हां तो ड्रेस्डन श हराहून १२० मैल अंतरावर असतांही तो मोठी फौज घे- ऊन चार दिवसांत येऊन तेथें पोंचला. पुढे २६ वे ता- रिखेस मोठे निकराची लढाई झाली; परंतु शेवटी फौजांचे जमावास पळून जावे लागले, आणि मोरो ह्मणून कोणी एक युरोप खंडास जुलुमापासून सोडवावयाकरितां आला होता, त्यास एक गोळा लागून तो मेला. सप्टेंबर महिन्यांत बोनापार्ट यानें फौजेचे जमावावर कित्येक हल्ले केले; परंतु त्याचा आतां विजय होईना असे झालें. ड्रेसडन एथील लढाईनंतर जनरल वांडास यास धरून कैद केलें. ने आणि उडिनो यांचा स्वीडन ए-