पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ सानी झाली तसे तसे त्यांचें बोलणे वाढत चाललें; आणि त्यांचा युद्धांत पराजय झाला ह्मणून ते दरवारांत फारच आग्रह धरूं लागले. ज्या अमलदारांनी किल्ले राजाच्या स्वाधीन केले होते त्यांस सरकार गुन्हेगार ठरविलें. आप ली कांहीं फत्ते झाली ह्मणजे राजा तहाचें बोलणे करा- वयास लागे, परंतु पार्लमेंट फारच आग्रह धरी. जरी राजास आपले प्रजांशी तह करण्याची इच्छा असावी हैं चांगले; तरी सरदारानें तहाचे उद्योगास लागून युद्धाचा समय घालवणे हे योग्य नव्हे. ज्या वेळांत राजाने लढाई करावी तो वेळ आक्सफर्ड शहरांत सल्याचे उद्योगांत गमाविला. YX असे असतांही पहिले लढाईवरून तर वरीच त्यास आशा आली. पुढे अधिक अधिक राजाचा विजय होत चालिला; कार्नवाल प्रांत त्याचे स्वाधीन झाला; स्क्रेटि- नहिल ठिकाणाजवळ पार्लमेंट पक्षाचा पराजय झाला; दुसरा एक डिवैझिस शहरापासून सुमारें कोशावर रौंड- वेडौन " ह्मणून ठिकाण आहे तेथें झाला; आणि सर्वांत चमत्काराचा शालग्रेवफील्ड एथे झाला. त्रिस्त X शहर राजानें वेढा घालन घेतले. ग्लौसेस्तर याचेही तसेच केलें; तशीच न्युवेरी याजवळ जी लढाई झाली तीतही राजा जिंकला; आणि मार्कइस न्यूक्यास्तिल यानें उत्तरेकडच्या प्रांतांत फौज जमविली त्यावरून राजास मो- ठी आशा आली. या पहिल्या मारामारीत उभयपक्षींचा एक एक पुरुष अति पराक्रमी असा पडला. त्यांची नांवें जान हापडेन आणि लुसिस केरी किंवा लार्ड फाल्कलंड. चार्लस ४