पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फौजेशी मिळून चांगले ठिकाणीं तळ देऊन राहिली. तिचे मदतीस बर्नाडोट यानेंही स्वीड लोकांची मोठी फौज द्यावयाचें कबूल केले होतें. इकडे वोनापार्ट यानें- ही तयारी करून आपली बायको लुइझा इला राज्याचा कारभार सांगून व आपले मागे रूम शहराचे राजाने रा- ज्य करावें, असें ठरवून तो एप्रिल महिन्याचे १५ वे तारि- खेस पारीस शहरांतून आपले फौजेस मिळावयास गेला. कित्येक लढायांमध्ये जमलेले फौजेचा जय झाला, परंतु बोनापार्ट याची फौज फार त्यामुळे त्यांस मागे हटावें ला गले. लुनिन्बर्ग एथें एप्रिल महिन्याचे दुसरे तारिखेस लढाई झाली, तींत फ्रेंच यांचा अगदी मोड झाला, त्यां- चा एकही माणूस सुटला नाहीं, तीन हजारांस कैद केलें, व तीन निशाणे आणि वारा तोफा घेतल्या. त्याच दिवशीं प्रशियन जनरल वानबार्तेल यास माग्डीवर्ग एथें पाठ- विलें होतें, तेथें त्याचा पराजय झाला; परंतु त्यास जनरल विटगेन्स्तैन हा येऊन मिळाल्यावर फ्रेंच यांचे दोन ह जार लोक मेले, व जखमी झाले. आणि सुमारें एक ह जार कैद करून त्यांचा मोड झाला. मे महिन्याचे दुसरे तारिखेस लुझिन् एथें एक लढाई झाली. तींत फ्रेंच यांकडे स्वतः बोनापार्ट आणि दुसरे फौजेचा जनरल विझिंजिरोड होता. त्या लढाईत वि सांपासून तीस हजार लोक पडले, व विजय आपणाकड चा झाला, असें उभयपक्षीं मानिलें. पुढे कित्येक लढाया झाल्या, त्या सर्वांस मिळून उभयपक्षाचे सांगण्याप्रमाणे चा- ळीस हजार लोकांत कमी पडले नाहींत. जून महिन्याचे १ ले तारिखेस आस्त्रिया एथील एंपरर याचे सांगण्या-