पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची चौकशी करून, ते तीन जनरल व दुसरे सुमारे अकरा यांस फांश दिले, व बाकीच्यांस सोडविलें. फ्रेंच यांची रशिया देशांत विपत्ति झाली, तीमुळे ज नरल ड्यार्क याचे हाताखालची प्रशियन फौज त्याचा पक्ष सोडून कौंट्विगेन्स्तैन् यास मिळाली; व त्या मिला- फापासून शेवटीं प्रशिया एथील राजा व रशियन एंपरर या दोघांमध्यें तह झाला. तारिख १४ माहे जान्युआरी संन् १८१३ ते दिवशीं राजपुत्र रोजंट यास त्याची बायको वेल्स एथील प्रिन्सेस इनें पत्र लिहिलें कीं, माझे मुलीशीं माझे व्यवहारास प्रति- बंध केला, यामुळे माझे अवरूस बट्टा लागला. या पत्राचें उत्तर आले नाहीं, असे पाहून तिने तें वर्तमानपत्रांत छापून प्रसिद्ध केले; कारण की, तसे न केल्यास आपण तो आ- रोप कबूल केला असे लोकांस वाटेल, असे तिचे मनांत आलें. पुढे त्या गोष्टीचा विचार राजपुत्राने प्रिविकौन्सिल यांतील कित्येक लोकांस सांगितला; आणि त्यांनीही कांहीं दिवसपर्यंत प्रतिबंध असावा, ही गोष्ट बरी दिसते, असे सां- गितल्यावर, त्याचे बायकोनें त्या गोष्टीविषयीं स्पीकर याचे द्वारे कामन्स सभेत फिर्याद केली. सभेनें ती गोष्ट फार नाजूक जाणून तींत मन घातले नाही, परंतु प्रिन्सेस इचेकडे कांहीं अपराध नाहीं, अशीं बोलणीं मात्रउघड झाली. त्या वरून लंडन शहरांतील आल्डरमान, मेयर इत्यादि लो- कांनी केसिंग्तन पालेस तिला स्तुतिपत्र दिलें, व सर्व लोक तिचा पक्ष खरा असे ह्मणूं लागले. रशियन फौज श्रमापासून हुशार झाल्यावर प्रशियन