पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उडवून टाकण्याचे काम मार्शलने याजकडे देऊन तेथून निघाला. १६ वे व १७ वे तारिखेस डावुस्त आणि ने हे दोघेही सरदार नीपर नदीचे कांठीं क्रस्ना याजवळ प राभव पावले. बोनापार्ट, ब्रिसिना नदी उतरून विलना याकडे चालला; आणि डिसेंवर माहन्याचे ५ वे तारिखेस विपत्तीत पडलेली आपली फौज सोडून व फौजेचा सरदार- पणा मूरा यास देऊन गुप्त वेषानें पारीस शहरात चाल- ला. त्या स्वारींत फ्रेंच यांस रशियन यांनी बहुत दुःख दिलें, व हवा फार थंड यामुळे तीस हजारांवर घोडे मेले. असे बोनापार्ट यानें कबूल केले; आणि साहाशें स्वार आ- पले रखवाली करावयाकरितां ज्या सरदारांचे घोडे जी- वंत होते, असे सरदार व्यास जमवावे लागले, आणि त्या टोळीत जनरल यांस क्याप्तन यांचें, व कर्नल यांस ल हान सरदारांचें काम चालविणे जरूर पडलें. बोनापार्ट फ्रान्स देशांत नसतां आक्टोबर महिन्याचे २३ वे तारिखेस पूर्वीचे कामावरून दूर झालेले तिघे सर- दार मालेट, लिहोरी आणि गिलाड यांनीं तो मेला, अशी • खोटी बातमी उठवून सर्व शिपाई व कामगार यांस आपले हुकुमाखालीं वागण्याचे हुकूम केले. मुख्य प्रधान वगैरे जे कोणी ऐकेनात त्यांस कैद केले, आणि जनरल हूलिं पारीस एथील कमांडांट* यास गोळी मारिली; परंतु शे- वटीं ते धरिले गेले, आणि त्यांची लबाडी असे कळून शि पायांनीं आपलीं शस्त्रे ठेविलीं; आणि ते सुमारें वीस लहान मोठे सरदार, व तीन पूर्वीचे जनरल यांस कैद करून,

  • शहरचा बंदोबस्त करणारा सरदार.

३०