पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ चूस्त यानें कानिंग्सबर्ग मुख्य ठिकाण करून तो तेथें रा हिला, तेथें त्यास बोनापार्ट येऊन मिळाल्यावर तो विजय मिळवीत स्मोलेन्स्फो एथे येऊन पोचला. त्या शहरावर मोठे निकराची लढाई होऊन तें शहर फ्रेंच यांनी घेत ल्यावर रशियन लोक ती जागा फारकरून जाळून मो- स्को शहराजवळ गेले; आणि जातांना वाटेनें बहुतकरून सर्व त्यांनी जाळलें. सप्टेंबर महिन्याचे ७ वे तारिखेस त्यांवर बोरोडिनो डोंगरावर फ्रेंच यांनी हल्ला केला, आ- णि मोठी लढाई होऊन रशियन यांचा मोड झाला. नंतर मोस्को शहराचे सुमारे तीन चतुर्थांश जाळून रशियन तेथून निघून गेल्यावर बोनापार्ट १४ वे तारिखेस त्यांत शिरला, तेव्हां त्याचे हुकुमावरून जाळणारे ह्मणून तीनशें माणसांस धरून गोळ्यांनी मारिलें. तथापि रशियन फौज त्या शहरचे जवळ तळ देऊन शत्रूंस कांही सामान पोंचू नये असें करीत होती; आणि आक्टोबर महिन्याचे १८ वे तारिखेस मूरा याचे टोळीवर हल्ला करून तिचा कांहीं मोड केला. थंडीचे दिवसांमध्ये मोस्को शहरांत राहणे फार अश क्य, असे समजून फ्रेंच तें सोडून निघाले. नंतर २२ वे तारिखेस रशियन त्यांत पुनः शिरले. पुढे पळण्यामध्ये फ्रेंच यांची फार विपत्ति झाली. बोनापार्ट यानें कालु- गा याचे वाटेने जाण्याचा बेत केला होता, परंतु रशियन जनरल कुटुसोफ यानें बंदोबस्त केला होता, त्यामुळे ती वाट सोडणें प्राप्त झाले. नवेंबर महिन्याचे ९ वे तारिखेस स्लोलेन्स्को एथें त्यानें मुख्य तळ दिला, परंतु १३ वे तारिखेस तेथील तटबंदी