पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ परंतु त्यानंतर ज्यावर ब्रिटिश फौजेचे सरदारपणाचें काम पडलें, तो मेजर जनरल शीफ यानें शत्रूचा अगदी मोड केला, आणि जनरल वाड्स्वर्थ नऊशे लोकांसहित त्याचे स्वाधीन झाला. परंतु समुद्रांत अमेरिकन यांचा अधिक जय झाला. त्यांनी सप्तंबर महिन्यापासून डिसेंबर पावेतों तीन ब्रिटिश गलबतें धरिलीं. तथापि त्या ब्रिटिश गलबतांनी इतकी लढाई केली की, त्यांतून दोन हस्तगत होतांच त्यांनीं ला- गलींच जाळलीं, व तिसरे अगदी निरुपयोगी झाले होतें. संन् १८१२ मध्यें दुसरी मोठी लढाई युरोप खंडाचे उत्तरेस झाली. तिचें वर्तमान असें. नेदर्लंड एथील स्वारींतून परत आल्यावर बोनापार्ट यानें रशिया देशाशीं एक मोठी लढाई करून तंटा नाहीं असा करण्याचे वेतानें स्वीडन राज्यांतील पोमिरेनिया प्रांतांत जाण्याची मसलत केली; आणि वीस हजार शि पाई देऊन जनरल फ्रयां यास तेथे पाठविलें; तो फेब्रु- आरी महिन्यामध्ये या प्रांतांत गेला, आणि पुढले ऋतूचे प्रारंभी फ्रेंच फौज रैन एथील कान्फेडरेशन याचे फौ- जेशीं मिळून पोलंड देशाकडे चालली. मे महिन्याचे ७ वे तारिखेस बोनापार्ट आपली बायको व प्रिन्स आफ नुफ- शाटेल यांस समागमें घेऊन पारीस शहराहून १६ वे तारिखेस ड्रेसडन एथें आला. तेथें त्याची व आस्त्रिया एथील एंपरर व त्याची राणी यांची भेट झाली. त्या वेळेस रशियन एंपरर आलेक्झांडर विल्ना एथें आला होता, व पश्चिमेकडील पहिले फौजेचा मुख्य सरदार बार्केडीटो- ली हाही होता. जून महिन्याचे ११ वे तारिखेस डा-