पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हल्ले केले, ते दोनही सिद्धीस गेले. शत्रूनही मोठ्या शौ- र्यानें टिकाव धरिला, परंतु रात्र होण्याचे संधीस ते पळू लागले, व ते दिसत होते तंवपर्यंत इकडले लोक त्यांचे पाठीस लागले. दिवस उगवतांच पुनः त्यांचे पाठीस ला- गले. अशी सालामांका एथे लढाई होऊन अकरा तो- फा, कित्येक सामानांच्या गाड्या व आठ निशाणे हस्तगत झालीं; आणि बंदिवान धरिले. त्यांत एक जनरल तीन कर्नल, तीन लेफ्टेनंट कर्नल, एकशे तीस सरदार व सा- हा हजारांपासून सात हजारांपर्यंत शिपाई होते. मार्शल मामही फार जखमी झाला, आणि चार जनरल मेले. या विजयापासून फ्रेंच यांनी फार दिवस के दिझ शह- रास वेढा दिला होता तो उठविला. आणि लार्ड वेलिं- ग्तन याचे वर्तणुकीची अशी कीर्ति झाली की, त्यास स्पा- निश फौजेचा कमांडर इनचीफ ह्मणजे सेनापति असा किताब दिला. युरोप खंडांत असें वर्तमान असतां इंग्लंड व अमेरिका या दोन देशांमध्यें तंटा होता, तो तह करून मिटविण्याक रितां बहुत बोलणें होऊन शेवटीं लढाई करावी असे ठरलें. ● अमेरिकन फौजेनें क्यानडा प्रांत घेण्याचा उद्योग के- ला, परंतु सर्व प्रथमचे लढायांत त्यांचा पराजय झाला. आगष्ट महिन्यांत ब्रिटिश यांनीं डिंद्रोआ किला घेतला, व तेथील जनरल हल आपले फौजेसुद्धां शत्रूंचे स्वाधीन होऊन कैद झाला. जनरल हल्ल ज्याचे स्वाधीन झाला होता, तो मेजर जनरल ब्रूक, आक्टोबर महिन्याचे १३ वे तारिखेस क्वि- न्स टौन एथें नियागरा प्रांतांचे सीमेवर लढाईंत पडला;