पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरदार ठेवून आपण तेथून निघून मार्च महिन्याचे १५ वे तारिखेस ग्वाड़ियाना नदीचे दोनही बाजूंनी बाडा- होझ यास वेढा दिला. बहुत वेळ मोठमोठे तोफांचे भड- मार झाल्यावर शेवटीं दोन बुरुजांतून वाटा केल्या. पुढे एप्रिल महिन्याचे ६ वे तारिखेस रात्रीं एकदांच बहुत ठि- कांणी हल्ला केला; आणि प्रथम किल्ल्यावर चढाव झाला. परंतु शत्रूंनी इतका टिकाव धरिला, आणि खंदकापाठीमा- गून इतकी विघ्नें केलीं, कीं शेवटीं हल्ला करणारांस मागें हटावें लागले; परंतु किला साध्य झाल्यामुळे शहर आपाप हस्तगत झाले; तेथे हल्ल्याचे प्रारंभी पांच हजार लोक होते; परंतु त्यांतून हल्ल्याचे गडबडींत वाराशें मेले, व ज- खमी झाले. बाडाहोस एथील लोकांस मदत करण्यासाठी मामों, कुइडाड रोद्रिगो एथे जाऊन त्यास वेढा घालून राहिला, आणि त्याच वेळी सूल्ट सेविल शहराहून विलाफ्रांका यापर्यंत इस्त्रेमाडुरा प्रांतांत आला, परंतु बाडाहोझ शत्रूचे स्वाधीन झालें ऐकून तो परत स्पेन देशाचे हद्दीवर गेला. सूल्ट परत गेला अशी बातमी येतांच आ पले हाताखालची एकत्र मिळालेली फौज घेऊन वेलिंग्तन क्यास्तैल प्रांताकडे चालला; आणि जुलै महिन्याचे १३ वे तारिखेस अगुण्डा नदी उतरून १० वे तारिखेस सा- लामांका याचे समोर आला. कित्येक लढाया झाल्या, त्यांत सर टामस ग्रेम याचें शौर्य प्रगट झाल्यावर उभय- पक्षोंच्या फौजा समोरासमोर येऊ लागल्या. नंतर बावि सावे तारिखेस दोन प्रहरानंतर संधि चांगली पाहून वेलिं- ग्तन यानें शत्रूंचे डावे बाजूनें व समोरून एकदांच दोन