पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ कबूल केले नाही. शेवटीं तो अपराधी ठरून त्यास १८ वे तारिखेस फांशों दिले; तेव्हांही त्याचें चित्त अतिशय स्वस्थ आणि निर्विकार होतें. रोजंट याचे निरोपावरून पर्सिवल साहेबाचे मुलास ५.०००० पौंड द्यावे, व बायकोस दरवर्षास २००० पौंड नेमणूक असे पार्लमेंट सभेनें ठरविलें; व त्याचे बायकोचे मागे तिची नेमणूक पसिवल साहेबाचा कोणी वारसदार असेल, त्यास जन्मवर पोंचावी असा हुकूम केला. • पुढे लार्ड लिवर्पूल मुख्य प्रधान, लार्ड सिड्मौथ स्व- राज्याचा सैक्रतारी, अर्ल हारोबी, कौन्सिल याचा मुख्य आणि वान्सिर्ट साहेब एक्सचेकर याचा चान्सेलर अशा नेमणुकी झाल्या. या वर्षी नाटिंगमरौर आणि चेरौर व लांकाशैर एथील कापुसाचे कारखान्यांतील हलके लोकांनी जमाव करून अनेक प्रकारची बंडे केलीं, व त्यांपासून लोकांचे मनांत भय पडलें; परंतु त्यांतून कित्येकांस धरून फांशीं दिल्यावर सर्वत्र निर्भय झालें. बाहेर देशांत लार्ड वेलिंग्टन यानें जान्युआरी महि- न्याचे आठवे तारिखेस कुइडाड रोद्रिगो शहरास घेरा घातला; आणि विसावे तारिखेस सीमेवरचें तें मोठे शहर त्याचे हस्तगत झाले. त्या ठिकाणीं रखवालदार सरदारां- खेरीज १७०० लोक होते, आणि त्या विजयापासून १५३ तोफा व बहुत लढाऊ सामान मिळाले. हा विजय पाहून कृतज्ञतेनें स्पानियार्ड यांनीं त्यांस ड्युक कुइडाड रोद्रिगो असा किताब दिला. नंतर शूर वेलिंग्टन त्या किल्याचे तट नीट करून व तेथें रखवालीकरितां एक स्पानिश