पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारिखेस संध्याकाळी ५ वाजतां कामन्स सभेचे वाड्यांत जात असतां, बेलिंगम ह्मणून दारांत कोणीएक बसला होता, त्यानें एक पिस्तुलाची गोळी मारली, ती त्याचे छा तीचे डावे बाजूस लागली. नंतर तो पर्सिवल साहेब कांहीं अस्पष्ट शब्द बोलत थोडीं पावले जात असतां तो- डघशी पडला. त्या साहेबास लागलेच सभेचे मुख्याचे खोलीत नेले, परंतु तेथें पोंचण्याचे पूर्वी त्याचा प्राण गेला. तें पाहून सर्वांचे मनांत अतिशय भीति उत्पन्न झाली, आ- णि पुढे काय करावें तें सुचेना. अशा संधीस तो मारे- करी कोणास न कळतां पळून गेला असता; परंतु विचार- पूर्वक त्याने तेथे बसून तें क्रूर कर्म आपण केलें, ही गोष्ट कबूल केली. त्याचे चौकशीचे शेवटी, त्यास काय बोला- वयाचें असल्यास बोल ह्मणून सांगितले, तेव्हां त्यानें उत्तर केलें कीं, मी झालेली गोष्ट कबूल करितों, परंतु तें कर- ण्याचे कारण सांगण्याची माझी इच्छा आहे. सरकाराने मजवर जुलूम झाला, त्याची दाद दिली नाहीं; मी कोण व कसा आहे, हे त्या सर्वांस सरकारचा सेकतारी व बेकेट साहेब, ज्या दोघांशी माझी बहुतवेळ गांठ पडली आहे, त्यांचे द्वारें ठाऊक आहे. रुशिया एथील कोणीएक गवर्नर जनरल यानें आर्क् एंजल एथून रैगा शहरास पत्र पाठविले. त्यांत मजवर अगदीं खोटा आरोप लिहिला, व दाद मागितली ती मिळाली नाहीं. आहे; आणि हृदयावर हात ठेवून ह्मणाला, (मी जे केले तें योग्य केलें,) अशी खातरी एथें पुरती आहे. मी फार हतभाग्य पंधरावे तारिखेस त्याची चौकशी झाली, तेव्हां बुद्ध- भ्रंशाचें निमित्त त्याचे वकिलाने सांगितले असतांही त्यानें