पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ शांत ते कांहीं पराक्रम करून स्वाधीन झाले. नंतर आंतले बाजूचे दरवाजाची दिंडी उघडून त्यांतून एक- एकास तुर्क यांनी आंत ओढून घेतलें, आणि किल्यांत नेऊन प्रथम त्यांची वस्त्रे काढून घेऊन मग त्यांचा शि- रच्छेद केला. त्या आठशे लोकांतून एकही वांचला नाहीं, आणि एके महिन्यांत दुसरे आठशें ममेलूक यांस जवळचे शहरांत व खेड्यांत धरून ठार मारिलें. इजिप्त देशाचे वरील प्रांतांत बाकीचे बे होते, त्यांनी आठशे ममे लूक मिळवून नैल नदीचे कठीण प्रवाहांवर बहुत शिदी व आरव घेऊन राहिले; परंतु बहुत शिपायांनी जाऊन त्यांचा अगदी नाश केला. ते लोक सालादिन याचे दिवसांपासून तेव्हांपर्यंत जय पराजय मिळवून होते, ते शेवटीं असे नाश पावले. संन् १८१२ चे प्रारंभी राजा दुखण्यांतून बरा हो- ण्याविषयीं निराशा झाली, आणि राजपुत्राचे कारभारा- विषयीं जे प्रतिबंध केले होते, ते संपल्यावर लोकांस चिंता उत्पन्न झाली. कीं तो प्रधानांत अगदीं फेरफार करील; परंतु यानें आपला भाऊ ड्युक यार्क यास एक पत्र पाठ- विलें. त्यांत लिहिले की, मला कोणाचे सूड उगवावयाचे नाहींत, किंवा कांहीं अर्थ साधावयाचे नाहीत. इतकें खरें कीं, आपण लहानपणीं ज्यां वरोवर वाढलों यां- तून कित्येक आपले कारभारांत असावे, अशी इच्छा त्यानें सुचविली; परंतु लार्ड ग्रे आणि ग्रान्विल यांची कित्येक कामगारांशी मिळून कारभार करण्याची इच्छा नाहीं, असे समजून त्यानें त्यांस तसेंच काईम ठेविलें. पुढे मुख्य प्रधान पर्सिवल साहेब मे महिन्याचे ११ वे