पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ पत्राच्या सर्व नकला बादशाहास पाठविल्या. त्यांवरून ते सर्व वर्तमान महंमद अली यास कळले, ते त्यानें तुर्कस्था नचे सरकारास कळवून तेथून हुकूम आल्यावर बंड लाग- लेच मोडण्याची मसलत केली. महंमद अली सुएझ एथून कैरो शहरास आल्यावर त्यानें मेका शहरावर पाठविण्याचे पूर्वी आपले मुलग्यास सेनापतीचा अधिकार मार्च महिन्याचे १ ले तारिखेस देणार, असे जाहीर करून त्या समारंभाचे मेजवानीस सर्व ममेलूक लोकांस आमंत्रण केले. नंतर पुढे पायदळ, मध्ये घोड्यांवर वसलेले ममेलक लोक, मागें सियामबे व बादशाहाचे दोन मुलगे, आणि सर्वांचे मागें तुर्कस्थान याचे खार, असा तो समारंभ कैरो शहरांतील लहान र स्त्यांतून किल्ल्यांत जावयास निघाला. नंतर पायदळ किल्यांत पोंचलें, व ममेलूक लोक त्याचे आंतले व बा- हेरचे तटांचेमध्यें, दोनही बाजूंस उंच भिंती व जुन्या इमा रती अशे अरुंद वाटेनें चालत होते, इतक्यांत वाटेचे दो- नही शेवटाकडील दरवाजे लांविले. बादशाहानें त्या क्षणापर्यंत आपला बेत कोणास सांगितला नव्हता; आणि जरी त्याचे दोन मुलगे ममेलूक लोकांत होते, तरी आ- पले पायदळास भिंतीवर चढून त्यावर बंदुकांचा मार कर ण्याचा हुकूम केला. तेव्हां ममेक लोकांची अवस्था फार कठीण झाली. ते अरूंद जागेत कोंडले गेले, त्यामुळे त्यांचें तरवार मार- ण्याचें कसब व्यर्थ झाले, आपलेच लोकांची अडचण होऊं लागली, मेजवानीचे पोषाकांचे ओझें झालें, आणि बळकट फौजेचा दोनही बाजूनी हल्ला येऊन पडला. अ