पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० जून महंमद अल्ली यानें त्याशीं तह केला; आणि त्या तहांत एक कलम लिहिले की, त्यांचे सर्व फौजेनें येऊन कैरो शहराजवळ राहावें. हा करार त्यांतून बहुतांनीं मान्य करून ते कैरो शहराजवळ गीझे एथे नैल नदीचे पलीकडील कांठावर शयमबे याचे हाताखाली इजित देशचे वरचे बाजूस राहिले. . त्या वेळेस वाहाबी या नांवाचे लोक मका मेदिना हीं शहरें घेऊन जलदीनें चढून येऊ लागले, त्यामुळे तुर्क- स्थान याचे सरकारास फार भय वाटलें. डामास्कस एथील बादशाह युसुफ याच्यानें त्यांस हठविण्याचे काम होईना, ह्मणून आकर शहरचा बादशाह सलिमान यास हुकूम आला कीं, युसुफ याचे डोकें हुजूर पाठवावें, व डामास्कस एथील बादशाहत आपण करावी; परंतु यु- सुफ कैरो शहरास जाऊन महंमद अली बादशाहाचा आश्रय करून आपले शत्रूपासून सुटला. पुढे डामास्कस एथील बादशाहाच्यानेंही त्या धर्मबाह्य लोकांचा बंदो- बस्त होईना, असे पाहून महंमद अली बादशाह यास त्या- च्या बंदोबस्ताविषयीं हुकूम केला; आणि तें काम बजाव ल्यास आकर व डामास्कस या दोन ठिकाणच्या बाद- शाहती देण्याचे कबूल केलें, ते आकर एथील बादशाहास कळतांच त्याने ममेलूक लोकांशी मिळून महंमद अली- चा मुलगा मेका शहरावर फौज घेऊन जाईल. तेव्हां बाकीचे लोकांवर हल्ला करून त्याचा सूड उगवावा, असा • केला; परंतु सियामबे याचे चाकराने आपले धन्याशीं दगावाजी करून कैरो एथील वे व वरील इजिन देशां- तील वे आणि आकार एथील सलिमान यांचे कागद