पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिलगीर आहे, आणि तुमचे लोक इतके थोडे आहेत, असे जर मला कळले असतें तर मी तोफ मारिली नसती. मी त्यास तोफ मारावयाचें मुळीं कारण कोणतें ह्मणून पुसलें; तेव्हां त्यानें उत्तर केलें कीं, तुझी अगोदर तोफ मारिली; परंतु खचित गोष्ट अशी घडली नाहीं. त्याने सांगितले कीं, तुझास जी मदत पाहिजे असेल ती मी करीन, आणि मसलत सांगितली कीं, तुझी एखादे युनैटेड स्टेट्स एथील वंदरांत जावें, परंतु ही त्याची गोष्ट मी लागलीच कबूल केली नाहीं. क्षमा मागण्याचे त्याचे रीतीवरून माझा स्पष्ट निश्चय झाला की, जर एकादें ब्रिटिश फ्रिगेट त्याला भेटले असते, तर त्यानें खचित लढाई केली असती: क्यापटन बिंगट याने अशे प्रकारचें त्या कलागतीचें वर्तमान लिहिले आहे, आणि त्याविषयी संशय नाहीं. परंतु कमोडोर राजर्स यानें ह्मटले कीं, लिटल बेल्ट गलब- तानें प्रथम तोफ मारली, व तसा अमेरिकन निशाणाचा अपमान झाला, त्याचा सूड उगविणे मला प्राप्त झाले; आ- णि त्यानें आपले मनास येतील ते शायदी आणून हे पुर वूनही दिलें. संन १८११ वे वर्षी दुसरी मोठी गोष्ट घडली कीं, ममेलक लोक इजिप्त देशांत नाही असे झालें. ते ममेलक लोक इजिप्त देश आपला असे समजून तुर्कस्थानचे बादशाहाचा हुकूम जवरदस्तीवांचून मानोत नसत. जनरल फ्रेझर याचे हाताखालची ब्रिटिश फौज इजिप्त देशांत गेली, तेव्हां ते महंमद अली बादशाह यांशीं उघड लढाई करीत होते. परंतु ब्रिटिश फौज आल्याची बातमी ऐकून ममेलूक हे तसे भयंकर नव्हत, असे सम-