पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ घांमध्ये एक कलागत होऊन त्या दोन सरकारांमध्ये लढाई होण्याचें भय' पडले. त्या कलागतीचे कारण लिटल् बेल्ट गलबतावरील क्यापटन बिंगम यानें असे लिहिलें आहे. मे महिन्याचे १६ वे तारिखेस दोन प्रहरानंतर सा- डेतीन वाजतां, पूर्वी एक परकी गलबत दिसले होते, त्याचा बत लढाई करण्याचा दिसला; कारण कीं, मी खूण केली, तिचें त्यानें उत्तर दिले नाहीं. साडेसाहा वाजता ते गल- बत आह्माजवळ फार येऊं लागले, असे पाहून मी विचार केला कीं, गैरसमजूत न व्हावी ह्मणून आपण जवळ जा- ऊन निशाणे लावावीं; ह्मणजे आह्मीं कोण आहों हे त्यांचे दृष्टीस पडावें. ह्मणून त्याजवळ जाऊन निशाणे लाविली. आणि कदाचित् अकस्मात् हला करितील, ह्मणून तोफांत दोन दोन गोळे भरून लढाईचीही तयारी केली. तें गल- वत हाक ऐकावया इतके जवळ आल्यावर मी, कोठचें गलबत, ह्मणून विचारिलें. त्यानें माझेच शब्द पुनः ह्मटले. फिरून हाक मारिली; आणि त्यानें फिरून माझ्या सारि- खेंच विचारिलें, आणि तोफ मारिली. मी लागलीच उल- टून मारिली. नंतर सुमारें पाऊण तासपर्यंत लढाई चा- लली; पुढे त्यानें तोफा मारावयाचें बंद केलें; आणि त्याचे गलबतामध्यें विस्तव पेटला असे दृष्टीस पडले. तेव्हां त्यानें मला विचारिलें कीं, है गलबत कोणतें. तें मी सांगून त्यास तसेंच पुसलें. त्यानें उत्तर केलें कीं, "युनैटड स्टेट्स फ्रिगेट." दुसरे दिवशीं तें गलबत पुनः जवळ येऊन, एके हो- डीवर त्यावरच्या एके सरदाराबरोबर कमोडोर राजर्स याचा निरोप आला कीं, गोष्ट फार वाईट झाली ह्मणून मी