पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ ज्यांवर तोफा १२४ व ८७९ माणसे होतीं, त्यांशीं लढा- वयाचा प्रसंग आला. मार्च महिन्याचे १३ वे तारिखेस लिसा बेटाचे उत्तरेकडे शत्रूंचें अरमार दृष्टीस पडलें; आणि पुढील गलबतांवर ब्रिटिश गलबतांनीं तोफा मारून सकाळी लढाईस प्रारंभ झाला. ती लढाई मोठी होऊन संध्याकाळचे प्रहर दिवसास फ्रेंच यांची दोन गलवते ४४ तोफांचीं व एक ३२ तोफांचें अशी तीन ब्रिटिश यांचे हस्तगत झाली. बाकीची वाट सांपडेल तिकडे गेली. बांडा बेटावर आगस्ट महिन्याचे ८ वे तारिखेचे रा- त्रीस काळोखांत खलाशी, गलबतांवरचे शिपाई, व क्या- प्टन कोल्स याचे हाताखालचे मद्रास एथील गोरे लो- कांचे पलटणींतून सुमारे चाळीस, असे मिळून सुमारें दोनशे लोकांनी हल्ला करून ते घेतलें. तिसरें टेर्नेट बेट याचे किल्ले जरी मजबूद होते, आणि पहिले लढाईचे वेळेस जरी इंग्लिश यांशी त्यानें स्मरण राहण्याजोगा टिकाव धरिला होता, तथापि इंग्लिश यांची फौज थोडी असतांही ते एके दिवसांत माहे आगष्ट ता- रिख २९ ते दिवशी हस्तगत झालें. चवथे जावा एथील राजधानी शहर बटेविया आ- गस्ट महिन्यांत लेफ्टेनंट जनरल सर साम्युअल आ कॅम्युटी याचे हाताखालचे ब्रिटिश फौजेनें घेतलें; शत्रूचे फार भयंकर किल्ले घेतले, व त्यांस बांटम आणि जाकत्रा या राज्यांतून काढून दिलें. नंतर तें ब्रिटिश राज्याकडे चालू लागले. अशी सर्व देशांत राज्ये मिळत असतां ब्रिटिश राजाचें एक गलबत व अमेरिकन सरकारचें एक गलबत या दो- २९