पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

षाकरितां पुढे लिहिल्या आहेत. लढाईचे भरांत टाम- सन या नांवाचा कोणी एन्सैन यास त्याचे हातांतील निशाण दे असे शत्रूचे फौजेंत कोणी झटलें; तेव्हां त्यानें उत्तर केलें कीं, मी हें आपले जीवावरोवर देईन, आणि . असें ह्मणून तो पडला. दुसरा वाल्श या नांवाचा एक एनसैन फार जखमा लागून पडल्यावर, त्यानें निशाणाचा फडका फाडून तो आपले छातींत खोंचला, तो मेल्यानंतर तसाच सांपडला. सर विलियम बेर्सफोर्ड यावरही एके पोलिश स्वाराने हल्ला केला, त्यास सर विलियम यानें घो- ड्यावरून खालीं ओढलें; तथापि तो त्यास मारावयास उद्युक्त त्यास शेवटी एके स्वारानें मारिलें. झाला. दुसरीं बाहेर देशांत वर्तमानें बहुत घडलीं, परंतु त्यांत हाशील गोष्ट इतकी कीं, लार्ड वेलिंग्तन याची वर्तणूक मसलतीची व शहाणपणाची, आणि ब्रिटिश सरदार व त्यांचे स्नेही स्पानिश व पोटुगीस यांमध्ये एक मत होते; ह्मणून फ्रेंच यांच्यानें बंडाचा बंदोबस्त लागलाच करण्या ची प्रतिज्ञा सिद्धीस गेली नाहीं; आणि जसजशी शत्रूंची कीर्ति कमी होत चालली, तसतसी स्पेन व पोर्टुगल एथें आपले पक्षाची उमेद वाढत चालली. समुद्रामध्यें संन् १८११ वें वर्षों जे विजय झाले, त्यांत लिसा बेटाजवळ फ्रेंच व इटालियन अरमाराचा मोड झाला, व बांडा आणि टर्नंट ही बेटे आणि जावा बेटाची राजधानी बटेविया हीं हस्तगत झालीं, तें वर्तमान लिहितों. वर लिहिलेली फ्रेंच वगैरे गलबतें लहान मोठी मिळून अकरा होती, त्या सगळ्यांवर २७२ तोफा आणि २६५५ माणसे होती. त्यांशीं व ब्रिटिश राजाचीं गलबतें चार,