पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४५ दुसरे दिवशीं झाला. तेव्हां रोटा एथून सेंट मेरीझ पर्यंत समुद्राचे पूर्वेकडील सर्व मोरचे एकावांचून अकस्मात् घेतले. दुसरी लढाई जून महिन्याचे सोळावे तारिखेस आल्बु- हिरा एथे मार्शाल सुल्ट आणि सर विलियम बेर्सफोर्ड या दोघे सरदारांमध्ये झाली, तींतही ब्रिटिश यांचा जय झाला. पूर्वी बातमी होती की, सुल्ट, सेविल शहराचा बंदोबस्त करून आपले रक्षणाचे उद्योगांत आहे, परंतु १२ वे तारिखेस बातमी आलो कीं, तो तेथून निघून इस्त्रिमाडुरा प्रांतावर आला आहे. हे ऐकून सर विलियम बेर्सफोर्ड बाडाहौस एथील वेढा कांहीं माणूस न गमावतां उठवून आपली फौज जमवून १५ वे तारिखेस जनरल क्यास्ते- नोस, व ब्लेक यांस जाऊन मिळाला, दुसरे दिवशी त्या- वर शत्रूनी हल्ला केला, आणि त्यांचे स्वार बहुत व तोफ- खाना मोठा होता, ह्मणून त्याचा जय होईल असे वाटत होते; परंतु ब्रिटिश फौजेचे शौर्यामुळे त्या दिवसाचा विजय यांकडे फिरला, आणि १७ वे तारिखेचे रात्रीस फ्रेंच यांचे लष्करांत पळ सुटला, व त्यांचे सुमारे २००० लोक मेले, व ९०० पासून १००० पर्यंत धरिले गेले. इकडेही तसेच बहुत पडले, परंतु सर विलियम बेर्सफोर्ड यानें लार्ड वे लिंग्तन यास पत्र पाठविले; त्यांत लिहिले आहे की, "सर्व लोकांनी आपणास जे योग्य तें केलें; व आमचे लोक ७ आणि मुख्यत्वे ५७ वी पलटण यांतून मेले, त्यांच्या लढाईप्रमाणे रांगा पडल्या होत्या, आणि त्यांस जखमा पुढले आंगाने लागल्या होया." याखेरीज पर्सिवल साहेबाने कामन्स समेत गोष्टी सांगितल्या, त्याही वाचणाराचे संतो- के. मं. म. द. वा. पोतदार,