पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ नंतर लार्ड प्रेसिडेंट, राजाचे कुटुंबांतील ड्युक क्यां तर्वरी एथील आर्चबिशप, व इतर सर्व लोकांनी अनुक्र- माप्रमाणे राजपुत्राजवळ जाऊन त्याचे हाताचें चुंबन केलें. नंतर थोडके वेळपर्यंत दरबार होऊन रीजंट यानें मंडळी जवळ भाषण केलें; पुढे मुख्य प्रधान व एक्सचेकर याचा चान्सेलर पर्सिवल साहेब यानें भेट घेऊन त्याच्या हा ताचें चुंबन केलें. फेब्रुअरी महिन्याचे १२ वे तारिखेस पार्लमेंट सभे- चा प्रारंभ करण्यासाठी कित्येक कामगार नेमून सभेचा प्रारंभ झाला. त्या वेळेस रीजंट नेमण्याची गरज पडा- वयाजोगी राज्याची स्थिति झाली, ही गोष्ट वाईट झाली; समुद्रांत व जमिनीवर ब्रिटिश फौजेनें बहुत पराक्रम केले; पोर्टुगल देशांत व केदिझ शहरांत शत्रूची मसलत फसली, व ब्रिटिश यांचा शूरपणा पाहून आपले स्नेही राजांची फौज यत्न करीत आहे, या गोष्टी सांगितल्या; आणि दुसरें ही सांगितले कीं, अमेरिका देशाशीं सांप्रत बोलणें चा- लले आहे, तें स्नेहभावानें संपवावें, असें रीजंट याचे म नांत आहे. आणि सरकारास जितकी गरज लागेल ति तका पुरावा पार्लमेंट सभेनें करावा असा भरंवसा आहे. या भाषणावर योग्य उत्तर द्यावें असें कामन्स सर्भेत मि- लन्स साहेबाचे बोलण्यावरून ठरलें. जून महिन्याचे १९ वे तारिखेस राजपुत्र रीअंट यानें आपले बापाचे जन्म दिवशीं एक मोठी मेजवानी केली. तीत सर्वांनी स्वदेशांत केलेली वस्त्रे पोषाक करून यावें, असा हुकूम केला; कारण कीं, कांही दिवसांपासून राजाचे दुखण्यामुळे कारागीर लोकांचा जिनस खपेना, असे झालें