पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ होते. त्या मेजवानीसाठी अतिशय मोठा समारंभ केला होता; व बहुत मोठमोठे गृहस्थ व बायका, सरकारी काम- गार, बाहेरचे दरबारचे वकील, शहरांतील पहिले प्रतीचे व मध्यम प्रतीचे लोक हे सर्व होते. ती मेजवानी व गाणें आणि नाचणें प्रहर रात्रीपासून सूर्योदयपर्यंत झाली; व तिचेसाठी केलेला समारंभ लोकांस पहाण्यासाठी कित्येक दिवसपर्यंत ठेविला होता. कामन्स सभेत फेब्रुअरी महिन्याचे २१ वे तारिखेस एक्सचेकर याचा चान्सेलर यानें सांगितले की, रीजंट नेमण्याविषयींचे कायद्याचा विचार चालला असतां १२ किंवा १३ हजार पौंडपर्यंत रीजंट यास घरगुती खर्चा- बद्दल नेमणूक असावी, असा विचार मी काढणार, असें सभेस कळून मी तो बेत राजपुत्रास कळविला; परंतु त्यानें सांगितले की, लोकांवर कर बहुत झाले आहेत, त्यास आ- णखी नवे मी आपले उपयोगाकरितां वाढविणार नाहीं. पसिवल साहेबानें दुसरे ह्मटले कीं, लोकांवर फार कर बसूं नयेत, असा विचार करून राजपुत्रानें नेमणूक नको झटली, असे त्याचे स्वभावावरून ध्यानास येतें, व या त्याचे विचारापासून त्यास जितकी शोभा आहे, तितकी किती राजांसारिखा डौल केला तरी येणार नाहीं. या बैठकीत तीन कायदे मोठे ठरले. एक थोडके कर्जासाठी लोकांस उगीच बंदींत ठेवावें. तें बंद करण्यासाठी, दुसरा ब्रिटिश व ऐरिश मिलिशिया यांचे काम लाग- ल्यास आपले देशांतून बदल करावा; व तिसरा असा की, गिनी, अर्ध गिनी व सात शिलिंग याचें नाणेंही अनुक्रमानें २१ शिलिंग १०३ शिलिंग व ७ शिलिंग यांपेक्षां