पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ जे प्रिविकौन्सिलर नव्हते ते खोलीचे दाराजवळ बसले. नंतर राजपुत्रानें या अर्थाचें भाषण केलें. "लार्ड साहेब, मला कळले की, मला रोजंट ज्या पार्लमेंट सभेच्या काय द्यानें नेमिलें, त्याप्रमाणे मला कांहीं शपथा घेतल्या पाहिजेत, व कांहीं प्रतिज्ञा केली पाहिजे. तर त्यास मी तयार आहे." नंतर लार्ड प्रिविसील यानें बहुमानाने राजपुत्राजवळ जाऊन एके चामड्यावरून पुढे लिहिलेले वाचलें, व राज- पुत्रानें तें ऐकावयास येण्याजोगे स्वराने त्याचे मागून ह्मटलें. "मी मनापासून वचन देतों, व शपथ घेतों कीं, मी विश्वा सानें राजावर स्वभाव ठेवीन. मला ईश्वर सहाय होऊं." " मी मनापासून वचन देतों, व शपथ घेतों कीं, मी ग्रेटब्रिटन व अयर्लंड या राज्यांतील रीजंट याचें काम वास्तवीकपणानें, इमानानें, व तृतीय जार्ज राजाचे एका- बनावे वर्षी कायदा झाला आहे, त्याप्रमाणे चालवीन. या कायद्यानें माझे जवळ दिलेला अख्यार मी इनसाफाप्रमाणें चालवीन, व सर्व प्रसंगी माझें सामर्थ्य व बुद्धि खर्च करून राज्याची प्रतिष्ठा, व थोरपणा, आणि त्याचे प्रजांचें कल्याण करीन. मला ईश्वर सहाय होऊं." या शपथांवर सही झाल्यावर लार्ड प्रेसिडेंट यानें द्वि- तीय चार्लिस राजाचे राज्यांत दोनही पार्लमेंट सभांत पेपिस्त यांस बसण्याचा अख्यार नाहीं असे करून रा. जाचें शरीर व राज्य यांचा बंदोबस्त चांगला होण्यासाठी कायदा झाला होता, त्यांतील प्रतिज्ञा वाचून दाखविली, तीही राजपुत्रानें ह्मटली, व सही नंतर त्या दोनही दस्ताऐवजांवर लार्ड प्रेसिडेंट व प्रिविकौन्सिलर यांनीं साक्षी घालून ते दप्तरदाराकडे दिले.