पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० दुखणेकरी होती, व तिला वांचावयाची आशा नव्हती, ह्मणून वापास कांहीं तरी आपले हातची वस्तु द्यावी, असे तिच्या मनांत आलें, नंतर तिनें एक आंगठी करवून ती. भेटीचे वेळेस आपले बापाचे हातांत प्रीतीनें घालून, माझें स्मरण धरा असें बोलली. परंतु या दुःखानें राजाचे शरीराची व्याधि वाढली, व त्यास बुद्धिभ्रंश झाल्यामुळे पा र्लमेंट सभेस कामकारभार चालविण्याची तजवीज करणें जरूर पडलें. मग ती राजकन्या नवेंबर महिन्याचे २ रे तारिखेस मृत्यु पावली, व तिचें शरीर विंड्सर एथे पुरलें. कांहीं दिवस गेल्यावर सन १८११ चे प्रारंभी दोनही सभांमध्ये विचार ठरला की, राजाचा मुलगा प्रिन्स वेल्स यानें राजा दुखणेकरी आहे तंवपर्यंत त्याचे ठिकाणीं रि- जेंट या किताबाने कारभार चालवावा; परंतु एक वर्षपर्यंत लार्ड वगैरे किताब नवे देऊं नयेत, आणि राजपुत्र जीं कामे व बैठे पगार देईल, ते त्याचा कारभार संपल्यावर राजानें काईम न केल्यास बंद व्हावे, आणि राजाचें शरी- राची खबरदारी राणीने करावी. तारिख ६ वी माहे फेब्रुआरी सन १८११ ते दिवशीं प्रिन्सवेल्स यानें रीजंट या कामाच्या शपथा घ्याव्या असे ठरले. त्याप्रमाणे सुमारे अडीच प्रहर दिवसास सर्व ड्युक व प्रिविकौन्सिलर, क्यार्लटन हौस एथें मिळाले. नंतर राजपुत्र आपले प्रधान बरोबर घेऊन मोठ्या समारंभानें बसावयाचे ठिकाणीं गेला. तेथें फार शोभा केली होती, व मोठे मोठे अरमारांतील सरदारांच्या तसविरी ठेविल्या होत्या. तेथें तो राजपुत्र मध्ये बसला, व त्याचा भाऊ आणि चुलत भाऊ आपापले मोठेपणाप्रमाणे डावे व उजवे बाजूस, आणि