पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ नाहीं, असें त्याने सांगितल्यावर त्याचे घरासभोवतें लोक जमले, व अनेक प्रकारच्या दांडगाया करूं लागले, व सरकारचे अपमानाचे शब्द बोलले, आणि दगड व विटा मारू लागले. नंतर घोडेस्वारांनी त्यांवर घोडे घालून त्यांस पळविलें, त्या गर्दीत बहुत दुखविले, परंतु त्यांत तिघांस मात्र मोठ्या जखमा लागल्या. पुनः लोकां- चा जमाव झाला, तो घोडे स्वारांनी हातांत तरवारी घेऊन पळविल्यानंतर, ते चहूंकडे तोफा ठेवून ९ वे तारिखेस ते त्याचे घरांत स्वयंपाकघराचे खिडकीतून शिरले, आणि त्यास धरून किल्ल्यावर नेलें. ते शिपाई येते वेळेस लो- कांनी त्यांवर भडमार केला. ह्मणून ते गोळ्या मारीत परत आले. वाटेनें त्या गोळ्यांनी तीन असामी मेले. जून महिन्याचे २१ वे तारिखेस पार्लमेंट सभा उठली. तेव्हां त्यास किल्यावरून मोकळे केले. त्यास घरीं ने- ण्याकरितां त्याचे मित्रांनी बहुत समारंभ केला होता; परंतु तो सर्व कबूल न करून तो एकटा चोरून बिंबलडन एथे आपले घरी गेला. मे महिन्याचे ३१ वे तारिखेस सेंट जेम्स वाड्यांत रा जाचा मुलगा ड्युक कंवर्लंड यास त्याचे खोलींत त्याचा चाकर सालिस या नांवाचा होता, त्यानें अडीच प्रहर रात्रीस मारावयाचा उद्योग केला. परंतु सिद्धीस गेला नाहीं, ह्मणून त्यानें भिऊन पळून आपणास मारून घेतलें. ड्युक यास जखमा लागल्या असतांही कांही दिवसांनीं अगदीं बरा झाल्यामुळे लोकांस बहुत संतोष झाला. सन १८१० वे वर्षी राजाचे कुटुंबांत दुसरा एक अनर्थ झाला. राजाची धाकटी मुलगी एमिलिया फार