पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ लुईस बोनापार्ट फ्रेंच राजाचा भाऊ यानें हालंड देशां- तील लोकांची स्थिति चांगली होण्याविषयीं व्यर्थ यत्न करून तें राज्य सोडल्याची जाहिरात लाविली. मग तो देश बोनापार्ट याचे हुकुमावरून फ्रान्स एथील राज्यास मिळविला. बोनापार्ट यानें एप्रिल महिन्याचे पहिले ता- रिखेस जोसफीन आपली बायको इला सोडून आर्च्ड- चेस मारिया लुइझा इशीं लग्न केलें. त्या वेळेस जानगेल जोन्स, ह्मणून एके लोकांचे मंड- ळीचा मुख्य होता, त्यानें चिट्यांवर हा प्रश्न लिहून प्रसिद्ध केला कीं, वाल्केन एथील लढाईचा विचार परकीय लो- कांनी कामन्स सभेत येऊन ऐकूं नये, हा हुकूम यार्क साहेबानें मुकरर करविला, हे किंवा विढम साहेबाने सां- प्रत छापाची स्वतंत्रता नाहीं अशी होण्याचा उद्योग केला, हे लोकांनी अधिक निंदा करावयास योग्य, या अपराधा- करितां जोन्स यास बंदीम ठेविलें. ही गोष्ट अयोग्य केली, असे मार्च महिन्याचे १२ वे तारिखेस पार्लमेंट स भेत सर फ्रान्सिस वडेंट या नांवाचे एके सभासदानें ह्मटलें, आणि त्यास मोकळे करण्याचा हुकूम व्हावा, ह्मणून बोलला, परंतु तें याचें वोलणें अधिक संमतानें रद्द झालें, ह्मणून त्यानें त्याविषयी आपणास नेमणारे प्रांतांतील लो- कांस एक पत्र लिहून ते वर्तमानपत्राचे द्वारें प्रसिद्ध केलें. ही गोष्ट त्यानें पार्लमेंट सभेचे कायद्याबाहेर केली, असें लेथ्वीज साहेबाचे ह्मणण्यावर ठरून त्यास किल्यावर बंदीस ठेवावे, असा सर आर साल्सबरी याचे ह्मणण्यावर ३ ७अधिक संमति पडून हुकूम झाला. तारिख ६ एप्रिल ते दिवशी त्यास धरावयास सर्जेंट गेला, त्यास मी जबरीने आपणास धरूं देणार