पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ पैक्याच्या टिपा झाल्या, व रात्रीं सर्व ठिकाणी दिव्यांची रोशनाई झाली. सन १८१० चे प्रारंभी फ्रेंच स्पेन देशांत शिरले, ही नवी गोष्ट झाली. जानुआरी महिन्याचे २९ वे तारिखेत ते सेविल शहरापासून सुमारे सहा मैल अंतरावर पोचले. त्यामुळे लोक चहूंकडे पळाले, व बहुत केदि शहराचे आश्रयास जाऊन राहिले. परंतु केदिझ शहर शत्रूंचे हल्ल्यावर टिकाव धरील, असे समजून ते लोकांचें भय गेलें, आणि तेथें लोकांचे वस्तीप्रमाणे अन्नाचाही पुरावा त्या सं- कटसमयीं येऊन पोंचला. स्पानिश अरमारावर आङ्- मरल पविस यास सरदार नेमिलें होतें, व किल्ल्याचा कारभार आणि संरक्षण हीं तीन प्रकारचे लोकांचे एके जमावाचे स्वाधीन केली होती. फेब्रुअरी महिन्याचे प्रा रंभी फ्रेंच यांनी मालेगा एथें शिरून ते दोन दिवसपर्यंत लुटलें. आल्मीडा, आगस्त महिन्याचे २७ वे तारिखेस यासिना याचे हाताखालचे फौजेचे हस्तगत झालें, व फ्रेंच यांचे फार लोभामुळे, व त्यांचा सरदार सून्ट याचे क्रूर- पणामुळे सेविल शहराची अतिशय दुर्दशा झाली. तथापि स्पानियर्ड यांस आपल्या देशाविषयीं प्रीति होती; ह्मणून त्यांचा कांही ठिकांणी जय होत असे. तशाच पोर्टुगल देशाविषयीं फ्रेंच यांनी जरीं अभिमानानें मोठमोठ्या प्र तिज्ञा केल्या होत्या, तथापि लिवन शहर ब्रिटिश फौजेचे आश्रयाखालीं सुरक्षित राहिले, व त्यांचा गर्विष्ठ सरदार मा. सिना यास बसेको एथील लढाई नंतर लार्ड वेलिंग्तन याचे पुढून हटून जावे लागले. स्पेन आणि पोर्टुगल या देशांत असे वर्तमान असतां, '