पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६. काणीं गेली होती, त्या ठिकाणांहून त्यांस निघतां न यावें; मणून सामान भरलेली कित्येक गलबतें वाटेवर नदींत पुरलीं. राजाचा मुलगा ड्युक यार्क याजवळ फौजेचे मुख्य सेनापतीचे काम होतें; त्यामध्ये त्यानें फौजेंतील कामे यो- ग्यता न पहातां सांगितलीं, असा त्यावर आरोप आला. त्याची चौकशी होऊन कामन्स सभेत बहुत संमतानें त्याजवर गुन्हा नाहीं असे ठरले. तथापि त्यानें आपलें काम सोडिलें, व पुढे त्यावर सर डेविड डंडास यास नेमिलें. या वर्षी लार्ड ग्यांबियर व लार्ड काक्रेन यांचे हाता- खालचे ब्रिटिश अरमारानें बास्क रोड्स यांत एप्रिल म हिन्याचे ११वेव १२वेतारिखेस फ्रेंच अरमारावर हल्ला केला, तेव्हां त्यांतून एकशे वीस तोफांचें एक गलबत, ७४ तो- फांचीं पांच, व दोन फ्रिगेट हीं कांठास लागून फुटावया- सारिखी झाली. आणि एक ८० तोफांचें, दोन ७४ चीं, व एक पत्रासांचें इतकीं जाळली. या खेरीज बालटिक समुद्रांत सर जे सोमारीझ यानें रुशियन अरमार घेत लें, व फ्रेंच यांची तीन मोठीं गलबतें, दोन फ्रिगेट, व वोस भाड्याचीं गलबतें, लार्ड कालिंग्वूड यानें फोडली, आणि केएन, मार्टिनिक, इस्किया, व प्लारिडा ही बेटे, आणि सेंटडोमिंगो शहर हीं घेतली. असा बाहेर विजय होत असतां राजाचे राज्याचे पन्ना- सावे वर्षाचा प्रारंभ दिवस आल्यामुळे लोकांस फार उत्साह लंडन शहरांत सकाळी घांटा वाजूं लागल्या, ध्वज उभारले, शिपाई जमा झाले, दोन प्रहरी ईश्वर भजन झालें, दरिद्री कुटुंबें व गरीब कर्जदार यांचे मुक्ततेसाठी झाला.