पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ फौजेसहित स्पेन देशांत गेला; आणि तेथें टालाविरा या ठिकाणी जनरल केस्टा याचे हाताखालीं स्पानिश फौज होती तिला मिळाला. जुलै महिन्याचे २७ वे ता- रिखेस लढाई झाली, तींत फ्रेंच यांच्या वीस तोफा व बहुत सामान जाऊन त्यांचे सुमारे दहा हजारांवर लोक मरून व जखमी होऊन, त्यांस मागें हटावे लागले. परंतु शत्रु मोठी फौज घेऊन आपणावर पुढून मागून एकदांच हला करणार आहेत, अशी बातमी लागल्यामुळे तो टेगस नदी उतरून परत पोर्तुगल देशांत गेला. त्या प्रसंगी सर आर्थर वेलस्ली यानें फार पराक्रम केला, ह्मणून राजाने त्यास लार्ड वेलिंग्तन असा किताब दिला. आस्त्रियन यांस अधिक मदत व्हावी, व स्केल्ट नदींत फ्रेंच यांची गलबतें होतीं, तीं धरून त्यांचा नाश करावा, ह्मणून पन्नास हजार ब्रिटिश फौज वाल्करेन बेटावर जा- ऊन उतरली; परंतु फ्लिशिंग हस्तगत होण्यासच फार वेळ लागला, ह्मणून शत्रूनी बहुत फौज जमविली. कित्येक तोफांचे भयंकर मोरचे बांधले, व आपलीं गलबतें लिलो किल्याचे वरचे बाजूस नदींत गेली. ब्रिटिश याचे उतरावयाचे ठिकाणी पूर आला होता. या लढाईचे उ- द्योगास बहुत खर्च लागला; परंतु दैव प्रतिकूळ झाल्या. मुळे वाल्करेन बेटावांचून दुसरे कांहीं साध्य झाले नाहीं. तें स्केल्ट नदीचें तोंड बंद करण्यासाठी, व हालंड देशांत ब्रिटिश जिनस नेण्याकरितां राखावयाचा बेत होता; परंतु तेथील हवेमुळे फार लोक मरूं लागले, यामुळे डिसेंबर महिन्याचे ९ वे तारिखेस किला, तोफखाना, गोदी वगैरे सोडून तेथून निघून गेले. तशीच फ्रेंच गलबतें ज्या ठि २८