पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ लढाई बंद केली, हे आणि तह केला हें राजास मान्य झाले नाहीं. असें सर ह्युडाल रिंपल यास सरकारी पत्र पाठ- विलें. पुढे त्याचे चौकशीकरितां एक कोर्ट नेमिलें, परंतु त्यांत कांहीं लिहिण्याजोगे ठरलें नाहीं. संन् १८०९ त स्पेन देशांतील ब्रिटिश फौजेचा सर- दार सर जान मूर त्या राज्याचे मध्यभागापर्यंत जाऊन पोंचला, परंतु फ्रेंच यांची फौज बहुत यामुळे त्यास फार जलदीने मागे हटावें लागले. त्या वेळेस त्यानें फार दक्षता व शौर्य हीं प्रगट केलीं, आणि कोरणा एथें जी लढाई झाली, तीमध्यें शत्रूंचा अगदीं मोड झाला, व ते जिकडे वाट सांपडली तिकडे पळाले. परंतु इतकी गोष्ट वाईट झाली की, त्या लढाईच्या प्रारंभी तो शूर सरदार पडला. बोनापार्ट याचा अगदीं पराभव करण्याची केवळ नि राशा होत होती, इतक्यांत आस्त्रियन दरबाराने त्याशीं लढावयाची प्रतिज्ञा प्रसिद्ध केली. परंतु त्यानें युक्तीनें त्यांचे टोळ्यामधून वाट फोडून त्यांचा कित्येक लढायांमध्यें पराभव केला, व विएना शहर घेतले. त्यास डान्युब नदीचे कांठावर आर्चड्युक चालिंस यानें जबरीने मागें हटविलें. तथापि वेग्रम एथील लढाईंत असा निर्णय झाला की, त्यावरून आस्त्रिया एथील एंपरर यानें लढाई वंद व्हावी, ह्मणून विनंती केली, व आपले तोट्याचे करार मान्य करून तह केला. असें वर्तमान बाहेर चालले असतां ब्रिटिश सरकारचे मनांत होतें आपले स्नेही राजांस मदत करून बोना- पार्ट याचा चढाव होऊं देऊं नये. सर आर्थर वेलस्ली फ्रेंच फौजेस पोर्टुगल एथून काढून देऊन आपले मोठे