पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ दक्षिण अमेरिका देशांत ब्राझिल्स एथें गेला होता, त्यानें आपले प्रजांस एक पत्र पाठविले, त्यावरून पोर्टुगाल देशचे उत्तरेस लोकांनी उठून त्या बाजूनें फ्रेंच लोक दांडगा - ईनें आंत शिरले होते, त्यांस घालवून दिले. त्या वेळेस पोर्टुगीस यांनी ब्रिटिश सरकारची मदत मागितली, ह्मणून एक बळकट फौज देऊन सर आर्थर वेलस्ली यांस त्यांचे मदतीस पाठविलें. तो पोर्टुगाल देशांत शिरून जनरल जुनो याचे हाताखालचे फौजेवर हल्ला कराव- यास राजधानीकडे चालला. कित्येक लहान लढाया हो- ऊन त्यांत शत्रूंचा मोड झाल्यावर एक विमिरा याजवळ मोठी लढाई झाली, तींत फ्रेंच यांच्या तेरा तोफा जाऊन सुमारे तीन हजार लोक मरून जखमी होऊन ते परत गेले. परंतु दुसरे दिवशीं सर ह्युडाल रिंपल, जिब्राल्टर एथील लेफ्टनंट गवर्नर, पोर्टुगाल एथील ब्रिटिश फौजेचा सर- दारपणाचे कामावर नेमणूक होऊन सिंत्रा एथें शत्रु होते, त्या ठिकाणी आला; आणि थोडे वेळाने जुनो यानें तहाचें निशाण देऊन निरोप पाठविला कीं, लढाई बंद व्हावी. हा त्याचा निरोप मान्य केला; व तह ठरविला कीं, फौजेने पोर्टुगाल देशांतून जावें, परंतु जाण्याचा खर्च मात्र त्रि- टिश सरकारानी द्यावा. त्या तहांत एक कलम असे होतें कीं, टेगस नदींतील रुशियन अरमारास उपद्रव करूं नये, किंवा त्याला तेथून जाऊं द्यावें. परंतु सर सी काटन यानें तें कलम कबूल केलें नाहीं, व पुढें तें अरमार ग्रेट- ब्रिटन व रुशिया यांमध्ये तह झाल्यावर सहा महिन्यांनंतर देण्याचे कराराने त्यांचे स्वाधीन झालें. या तहावरून इंग्लंड एथें राजा व प्रजा यांची फार गैरमर्जी झाली, व