पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ टिलसिट एथें तह झाल्यानंतर लवकरच बोनापार्ट यानें स्पानिश राज्य अगदीं नाहीं, असें करण्याची मस- लत करून अनेक निमित्तांनीं एक मोठी फ्रेंच फौज स्पेन देशांत पाठविली; त्यानें तेथील राजाकडून तें राज्य सोड- वून त्याचा वारिसदार फर्डिनांड यांस फौजेजवळून काढून कैद करून फ्रान्स एथें पाठविले, व आपला भाऊ जोझप याला स्पेन व इंडीस यांचा राजा, असा किताब देऊन त्या ठिकाणीं स्थापिलें. दोनापार्ट याचे जुलुमापासून लोकांस प्रथम भीति वा- टली, परंतु पुढे लवकरच त्यांनी बंडकरून त्यांशी लढण्या- ची प्रतिज्ञा केली. मग फ्रेंच फ़ौज त्या देशांत होती, तिचा बहुत ठिकांणी मोड करून जोझफ बोनापार्ट यास फौजेस- हित फार जलदीनें व फजीतीनें पळून जाणे प्राप्त केलें. एक मोठी मुख्य सरकारी सभा करून सातवा फर्डिनंड याचे नांवाने लढाईची प्रतिज्ञा केली; व ग्रेटब्रिटन याशीं तहा ची जाहिरात लावून मदत मागण्यासाठी वकील पाठविले. त्यावरून ब्रिटिश सरकारानें सर डेविड बेर्ड यास अर मार देऊन त्यांचे मदतीस पाठविले, व पैका शस्त्रे वगैरे यांचा बहुत पुरावा केला. परंतु बोनापार्ट आपले नेहमीप्रमाणें त्वरेनें बहुत फौज घेऊन स्पेन देशाचे कांठावर आला, आणि कित्येक लढा- यांत स्पानियर्ड यांचा अगदीं मोड करून त्यांनी जे किले व शहरे घेतली होती, ती परत घेऊन राजधानीत समारंभानें शिरला. पोर्टगाल एथील वारिसदार राजपुत्रास बोनापार्ट याने राज्य व आयुष्य हरण करण्याचें भय घातले, त्या वेळेस तो