पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ वेळपर्यंत तरी सैन्याचा धनीपणा तुझी आमचे पाशी द्यावा. ते ऐकून त्याने अतिशय संतापून उत्तर दिले की, " एक तासपर्यंतही देणार नाहीं." या नकारावरून पुढे राजा आणि प्रजा यांचा सला होईल असें राहिले नाहीं; आणि उभयपक्षों लढाई करावयाचा निश्चय झाला. या समयीं बहुत बुद्धिवान् लोक उत्पन्न झाले; आणि मुलुखांतील गडबडीमुळे हलके लोक थोर पदवीस चढू लागले. उभयपक्षांकडून जा- इ०स०१६४२ हीर खबरा प्रसिद्ध होऊं लागल्या; आणि लोकांचे उघड दोन पक्ष झाले, त्यांची नांवें क्यावेलियर्स आणि रौंड हेडस्. राजाची फौज त्या समयी फार थोडी होती; तीवांचून सर जान डिग्बी ह्मणून शेफ होता, त्यानेही कांहीं जम विली होती. ती सर्व मिळून तीनशे पायदळही जमले ना- हीं. त्याचे मुख्य बळ काय तें घोडेस्वार होते, परंतु तेही आठशांवर नव्हते; आणि त्यांजवळ सामान चांगले नव्हते. पुढे त्यास चहूंकडून फौज येऊन मिळाली, परंतु तितक्यानें शत्रूंचें निवारण होणार नाहीं, असें पाहून तो लहान लहान मजला करून डर्बी शहरास गेला; आणि तेथून श्रृस्वरी शहरास गेला; कारण कीं तिकडे त्याचे स्नेही होते त्यांचे संरक्षण व्हावें. त्या समयीं पार्लमेंट ही आपणाकडून तयारी करण्यांत कमती करीत नव्हते; त्या सभेची हल शहरांत सामान- सुमानानें भरलेली एक वखार होती. त्या शहरचा अंमल सर जान होथम या नांवाच्या पुरुषास दिला होता. पूर्वी ऐरिश लोकांचे पराजयासाठी जी जिकडे तिकडे फौज