पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ तर विंडर एथे परत आल्यावर राजाचे मनांत पश्चात्ताप झाला की, मी आजपर्यंत फार अविचारानें चाललो. पुढे कांहीं तरी नीट चालावें ह्मणून त्यानें पार्लमेंट सभेस लिहून पाठविलें कीं, आरोप ठेविलेले सभासदांचे शासन करावयाची मसलत मी सोडून दिली, आणि पुढे मी माझा प्राण आणि राज्य यांसारिखें तुमचे सत्तेचें संरक्षण करीन. मागें जुलूम केल्यामुळे कामन्स यांस तो दुष्ट वाटत होता; आणि जेव्हां अशी मान्यतेची गोष्ट निघाली तेव्हां त्यांस तो नीचही वाटू लागला. या काळापर्यंत सरदार नेमणें, आणि फौज जमा करणें इतकें राजाजवळ होतें. पोप मताचे भयानें कामन्स यांनी राजास अर्जी केली कीं, शहरचा किला आमचे स्वाधीन व्हावा; आणि पोर्टस्मौथ, आणि सरकारी अर मार ही आह्मी नेमूं त्या पुरुषांचे हस्तगत करावी. हा अर्ज मान्य केला असतां जुने राज्य नीतींतले कांही राहा- णार नाहीं, असें वाटून राजानें प्रथम ऐकिला नाहीं; परंतु निरुपाय होऊन, त्यानें त्याप्रमाणे केले. पुढे कामन्स यांनीं अर्से आरंभिलें कीं, राजा जितकें अ धिक ऐकेल तितके अधिक अधिकच मागावें, ह्मणून वर सां- गितली विनंती राजाने मान्य केल्यावर त्यांनी बोलणे लाविलें कीं, सरकारी फौज आमचे जवळ असावी, आणि आह्मी सांगू त्या सरदारानी तिचा बंदोबस्त ठेवावा; कारण आ मास पोप मताचे ऐरिश लोकांचें भय फार वाटतें, ते दूर करण्याचे उपाय आह्मी करणार. हें ऐकतांच एथें चार्लस राजानें होयकार द्यावयाचा बंद केला; तेव्हां पुनः त्यांनीं त्यास विनंती केली की, अमुक