पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ फौज येऊन भरली ह्मणून त्या किल्ल्यावरचे लोक तहाचें निशाण लावून तो स्वाधीन करून आपण प्रतिष्ठेनें बाहेर निघून गेले. तो किला पुनः घेण्याचा एक वेळ उद्योग केला, परंतु जनरल वैट्लाक याचे अज्ञानामुळे व भ्या- डपणामुळे तो फसला. पुढे तो वैट्लाक इंग्लंड एथें आ- ल्यावर कोर्टमार्शल यांत त्याची चौकशी होऊन त्यास राजाचे चाकरींतून दूर केलें. परंतु मोंटीविज्यो शहर व तेथील किला कर्नल ब्रौन याचे हाताखालचे सुमारें चार हजार ब्रिटिश लोकांनी घेतला. डेन्मार्क एथील दरबारानें ब्रिटिश यांशी कित्येक ठिकाणीं शत्रुभाव दाखविला, व तेथे अरमार तयार होत होतें, तें बोनापार्ट याचे स्वाधीन होणार, असे ऐकून लार्ड ग्यांबियर व अर्ल माकार्टनी यांस अरमार देऊन पाठविले; आणि हुकूम केला कीं, आह्मी तुमचा फ्रेंच यांपासून बचाव करितों, असें त्यांस वचन द्यावें. ते त्यांनी कबूल न केल्यास त्यांचें अरमार व सामान वगैरे सर्व घ्यावे. आ गष्ट महिन्याचे १६ वे तारिखेस फौज उतरून ब्रिटिश सरकारांनी हुकुमाप्रमाणें डेन यांशी बोलणे केलें; परंतु ते तें कबूल करीनात ह्मणून तीन अहोरात्र कोपनहेगन शहरावर तोफांचा भडमार चालविला. त्यापासून शह- राचा सर्वस्वी विध्वंस होतो, असे समजून डेन यांनी लढाई बंद करण्याची विनंती केली; आणि सप्तंबर महिन्याचे ७ वे तारिखेस त्यांनी आपली सोळा मोठीं गलबतें, पंधरा फ्रिगेट, सहा ब्रिग व पंचवीस बंदुकांच्या होड्या सामान- सुद्धां स्वाधीन केल्या. त्या वेळेस लोकांचे जिनगीस हात लाविला नाहीं, व सर्व बंदिवान परत दिले.