पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० यास एक्सचेकर याचा चान्सेलर, लार्ड मल्येव यास अरमाराचा मुख्य व लार्ड एल्डन यास लार्ड है चान्सेलर अशा नेमणुकी केल्या. पुढे काही दिवसपर्यंत पोलंड देशांत बोनापार्ट याचा मोड होण्यास प्रारंभ झाला; परंतु पलस्तक व ऐला एथील लढायांत त्याचाच जय झाला; डांझिक लवकरच त्याचे हस्तगत झालें; आणि जून महिन्यांचे १३ वे तारिखेस फ्रीड्लंड एथे लढाई झाली, तींत रशियन लोक इतके पडले कीं, त्यांचा एंपरर यानें टिसिट या ठिकाणी युद्ध बंद व्हावें, अशा करारावर सही केली; व पुढे लवक- रच तहाचे मूळ कलमाविषयी बोलणें होऊं लागले. प्रशि- यन राजास त्याचा स्नेही रशिया एथील एंपरर यानें सो- डिल्यानंतर नव्या तहाप्रमाणे त्याचें सुमारे अर्धराज्य गेले. त्या वेळेस रशियन, फ्रेंच आणि तुर्क या दोघांशी लढाई करीत होते, त्यांचे मदतीसाठी इंग्लिश सरदार सर जे टीडक्कर्थ व सर टी लुईस हे अरमार घेऊन डार्डनेल्स समुद्रांतून वाट करून कन्स्त तिनोपल शह- रास गेले. परंतु इच्छिली गोष्ट सिद्धीस जाण्याविषयों दहा दिवस यत्न करून त्या ब्रिटिश सरदारांनी परत जाण्याची मसलत केली. त्या वेळेस बुएनोस ऐरिस प्रांत ब्रिटिश यांकडून घे- तला अशी बातमी आली. त्या मोठ्या संस्थानाचे रक्ष- णाकरितां फार थोडे लोक ठेविले होते, त्यामुळे जनरल लिमियर्स ह्मणून फ्रेंच सरदार स्पानिश याचे चाकरीस होता, त्यानें तेथील राहणारे लोकांस फितूर करून त्या किल्ल्यावर हल्ला करविला. इतक्यात गलयांमध्यें स्पानिश 1