पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ हजार होती. फ्रेंच यांची त्याचे दुप्पट होती, आणि तिचा सरदार बोनापार्ट स्वतः होता. पार्लमेंट सभेत गुलामाचा व्यापार अगदी बंद व्हावा, याचा विचार सुमारें वीस वर्षांपासून दर बैठकीस होत असे. शेवटीं या वर्षी त्या व्यापारापासून राज्याची अप- कीर्ति, व वेस्टइंडिया बेटांस त्याची गरज नाही, असे सर्वांचे मनांत येऊन संन् १८०६ चे जून महिन्याचे १० वे तारिखेस फाक्स साहेबाने त्या विचाराचा उपक्रम केल्या- वर त्यास अनुकूळ संमति ११४, व प्रतिकूळ १५ पडल्या. पुढे थोडे दिवसांत लार्ड सभेत त्यावर अनुकूल ४९ व प्रतिकूळ २० पडून तो कायदा ठरला. वर्षाचे सतंबर महिन्यांत सरकारचा सेक्रतारी फाक्स साहेब आपले वयाचे एकुणसाठांवे वर्षी मृत्यु पावला. त्याचे शरीर मोठ्या समारंभानें वेस्तमिन्स्तर आबी एथें पुरले. त्या या वर्षी पार्लमेंट सभेत असा विचार निघाला कीं, पोप याचे मताचे लोकांस मोठे अबरूच्या जागा देण्या- ची जी बंदी आहे ती नाहीं अशी करावी. याविषयीं प्रधानांनी फार मेहनत केली. परंतु राजानें राज्याभिषे काचे वेळेस जी शपथ घेतली होती, तीप्रमाणे आपण त्या कायद्यास संमति देणें योग्य नाहीं. असें जाणून प्रधा- नास सांगितले की, एकदां हा विचार सोडल्यावर मग पुनः तो विचार कधी काढू नये असे वचन द्यावें. तें न देऊन त्यांनी कामें सोडल्यावर डयुक पोर्टलांड यास मुख्य प्रधान क्यानिंग साहेब लार्ड हाक्स्बरी व लार्ड क्यास्तेल यांस सरकारचे सेकतारी, पर्सिवल साहेब