पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ विला, व त्या तहाचा प्रोटेक्टर ह्मणजे राखणारा असा आपण किताब घेतला; यामुळे दुसरा फ्रान्सिस यास जर्म- नी एथील एंपरर हा मोठा किताब सोडणें प्राप्त झाले. व सगळी संस्थानें एकाचे आज्ञेत वागत असत तें मोडलें. अशी युरोप खंडाची स्थिति झाल्यावर बोनापार्ट या चा पराक्रम दुर्निवार झाला. पुढे पुनः एक वेळ तहाचें बोलणें होऊं लागले. ते मनापासून होतें, असें दिसत होतें, व फाक्स साहेबास लढाई बंद व्हावी अशी इच्छा होती. परंतु ब्रिटिश राज्याची प्रतिष्ठा व संरक्षण यांस योग्य नव्हे इतकें दिल्यावांचून तह होत नाही, असे झाल्या- वर कांहीं दिवस वाट पाहून ब्रिटिश वकील परत आले. . त्या वेळेस फ्रेंच सरकारानें फार जुलूम आणि लबाडी आरंभिली. प्रशिया एथील राजा त्यांशी फार दिवस स्नेह करून नम्रतेने वागत होता, त्यासही तिरस्कार येऊन त्याने प्रतिज्ञा केली की, पुढे आपले राज्याचे व अवरूचें रक्षण बाहुबळानेंच करीन. परंतु या समयीं त्यानें फ्रेंच सरकाराशीं विरोध आरं- भिला, ही शाहाणपणाची गोष्ट केली नाहीं; कारण कीं, इतके दिवस फ्रेंच यांशी स्नेह ठेविल्याने त्याचें दुसरें को- णतें दरबार स्नेही राहिले नाहीं; व त्याची फौज फार दिवस रिकामी होती; ह्मणून लढाईची नवी रीति तिला अगदीं माहीत नव्हती. असे असतांही त्यानें धैर्यकरून आक्टोबर महिन्याचे १८ वे तारिखेस जीना एथे लढाई केली; तींत संध्याकाळी साडेतीन वाजता फ्रेंच यांचा पूर्ण जय झाला. त्या लढाईत प्रशियन फौज सुमारें नव्वद