पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ स्विर्ड यास शोध लागला. पूर्वी स्पेन व फ्रान्स यांचे मिळून तेहतीस गलबतांचे अरमार सांगितले होतें, त्यांत चार मात्र वांचलीं; बाकी सर्व धरिली व फुटलीं गेलीं. या विजयाचें वर्तमान ऐकून इंग्लंड देशांत हर्ष व शोक हे दोनही झाले. हर्ष होण्यास कारण हें की, आपले अर मार अजिंक झालें; व शोकास कारण हें की, फार शूर व गुणी सरदार तरुण वयांत व आपले उमेदीत मृत्यु पा वला. मग त्यास शत्रूंचा पराजय करून जी फार कीर्ति · प्राप्त झाली होती, ती मागें राहाण्यासाठी त्याचें शरीर मोठ्या समारंभानें सेंटपाल याचे देवळांत पुरलें. या खेरीज लोकांस चिंता होण्यास कारण झाले. तें हें कीं, फ्रेंच सरकाराचा फार वाढत चालला; यामुळे बाकी जीं स्वतंत्र संस्थानें राहिली आहेत, ती लवकरच त्यांस सामील होतील, किंवा त्यांचे तावेखालीं राहूं लागतील असे भय पडलें. तारीख २१ माहे जान्युआरी संन् १८०६ ते दिवशीं पार्लमेंट सभा बसली. तेव्हां राजाने मोठे हर्षानें कळ- विलें कीं, अरमारानें आलीकडे जो विजय मिळविला, त्यापा- सून आपली कीर्ति राहिली, आणि सांगितले की, जर्मनी देशचा एंपरर यानें जरी लढाईंतून आपले आंग काढले, तथापि रशिया एथील एंपरर आपण धरलेली मसलत कधी सोडणार नाहीं, असे खातरांचे निरोप सांगून पाठ- वीत आहे. पुढें सभांनी आपले नेहमीचें काम चालविण्यास प्रारंभ केला. इतक्यांत मुख्य प्रधान पिट साहेब याचे मरणा- मुळे त्यांत विघ्न झालें. त्या पिट साहेबाने प्रधानाचें काम