पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ सरदार आडमरल विल्सन व स्पानिश सरदार ग्रावीना नाम होता. . दोन प्रहरानंतर एक वाजतां ब्रिटिश गलबतांनीं शत्रू च्या रांगा फोडून लढाईस प्रारंभ केला. तीत शत्रूनी बहुत पराक्रम केला. परंतु शेवटी त्यांचा पराजय झाला. संध्या- काळी तीन वाजावयाचे सुमारें शत्रूंची रांग फुटली. मग आडमरल ग्रावीना दहा गलबतें घेऊन फ्रिगेट यांस मिळून केडिझ शहराकडे निघाला. सगळी मिळून ब्रिटिश यांस एकुर्णास गलबतें सांपडली; त्यांवर आडमरल विल्स- नव दुसरे दोघे आडमरल होते. अशा लढाईत बहुत लोक पडल्यास आश्चर्य नाहीं; परंतु सगळे ४२३ लोक मेले, व ११६४ जखमी झाले. परंतु एक मात्र गोष्ट मोठी वाईट घडली. ती अशी की, अर्धे लढाईचे सुमारें लार्ड नेल्सन यास छातीचे डावे वा- जूस बंदुकीची गोळी लागली. त्यास खालीं नेतांच दुःख फार होऊन मृत्यूची चिन्हें होऊं लागली. तथापि तो शुद्धीवर होता; आणि जेव्हां विजय पूर्ण झाला; हे त्यास कळले तेव्हां संतोषानें ईश्वराचा स्तव करून व हुकूम करा- वयाचे होते ते स्पष्ट शब्दांनीं करून त्यानें प्राण सोडिला. ती त्राफालगर एथे लढाई झाल्यानंतर पुढे ब्रिटिश सरदार सर स्वीर्डस्त्रान एक ऐशीं तोफांचें व तीन चव- ज्याहत्तर तोफांचीं गलबतें घेऊन शत्रूंची वाट सांभाळीत होता. इतक्यांत तितक्याच वजनाची व तितकींच फ्रेंच गलबतें राचफोर एथून निघून येत होतीं, तो त्यास भेटलीं, तेव्हां मोठी लढाई होऊन फ्रेंच गलबतें धरली गेलीं. तीं त्राफलगर एथून परत आलेल्यांतली होती, असा सर