पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ झाली, रशियन फौजेंत पन्नास हजार लोक व आस्त्रि- यन फौजेंत सुमारें पंचवीस हजार होते. फ्रेंच फौजेंत • सुमारें एक लक्ष होते. त्या लढाईत फ्रेंच यांचा जय झाल्यावर उभय पक्षीं लढाई बंद होण्याचा करार ६ वे तारिखेस ठरला, व तह होऊन त्यावर २६ वे तारिखेस सह्या झाल्या. तो असा की, आल्पस डोंगरापलीकडील सर्व राज्य फ्रेंच यांनी चालवावें. तेव्हां जर्मनी देशचा एंपरर यानें बोनापार्ट इटली देशचा राजा, असा कबूल केला; परंतु तें राज्य पुढे फ्रेंच राज्यापासून वेगळे असावें. अशा करारानें आस्त्रिया देशचा स्वतंत्रपणा राखण्याविषयों बोनापार्ट राजी झाला. असा बोनापार्ट विजय मिळवून आस्त्रिया देशचे सर- काराकडून मनास येईल तसे करार करून घेत असतां, ब्रिटिश अरमाराने त्याचा अगदी पराजय करून त्याचे बेत मोडिले. त्या वेळेस केडिझ बंदरांत फ्रान्स व स्पेन या दोहोंचीं अरमारें होती, त्यांची चौकशी करण्याकरितां, ठेविलेले अर मारावर लार्ड नेल्सन यास सरदार नेमिलें होतें. त्यास अक्टोबर महिन्याचे १९ वे तारिखेस बातमी कळली की, तें अरमार बाहेर निघून गेलें तें मेदितरेनियन समुद्रांत गेले असेल, असे जाणून तो त्यांत जलदीनें शिरला. त्या जवळ गलबतें सत्तावीस होतीं, व त्यांत तीन चौसष्ट तो- फांचीं होतीं. सोमवारी २१ वे तारिखेस शत्रू केपना फा- लगर या जवळ दृष्टीस पडले. तेव्हां त्याने आपले गल- बतांच्या दोन रांगा केल्या. शत्रूंचे गलबतांमध्ये १८ स्पानिश गलबतें व पंधरा फ्रेंच, अशी होती. फ्रेंच यांचा