पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ रिखेस तीन टोळ्या करून रैन नदी उतरली, व आस्त्रि- यन यांस रशियन येऊन मिळण्याचे पूर्वी त्यांशीं लढून वेटिंगन आणि गंगीसबर्ग एयें बहुत लोक मारून त्यांचा पराजय केला. पूर्वी सांगितलें कीं, या लढाईत प्रशिया देशचे राजानें केवळ उदासीपणा धरिला होता, तथापि त्या देशचा एक प्रांत फ्रांकोनिया यांत जनरल बेर्ना- डोट याचे हाताखालची फ्रेंच फौज सुमारे वीस हजार शिरली, आणि प्रशियन सरदार व प्रधान त्याचा जाब पुसूं लागले, तेव्हां फ्रेंच सरदारानें उत्तर केलें कीं, गरज पडल्यास जबरदस्तीने जावें असा मला हुकूम आहे. पूर्वी आस्त्रियन यांचा पराजय झाला, तो पुरा झाला नव्हता, परंतु अक्टोबर महिन्याचे १३ वे तारिखेस फ्रेंच सरदार मर्शल सूल्ट यानें मेमिंगेन यास वेढा दिला, व तें ठिकाण नऊ पलटणीसुद्धां हस्तगत झाले. १९ वे तारि. खेस आस्त्रियन यानीं अल्म शहरांतून निघून ड्युपों याचे हाताखालचे फ्रेंच फौजेचे टोळीवर हल्ला केला, परंतु त्या टोळीने त्यांचे पंधराशें लोक धरिले, व त्यांचा मोड केला. पुढे थोडे दिवशीं अल्म शहरावर आस्त्रियन जनरल मांक रखवालदार होता, तें कांहीं संशय होण्याजोग्या गोष्टी घडून फ्रेंच यांचे हस्तगत झाले. आणि या चार लढायांत मिळून आस्त्रियन यांची फौज चाळीस हजार पडली. आस्त्रियन व रशियन यांची फौज एकीकडे जमल्या- मुळे इतकें मात्र झालें कीं, फ्रेंच यांनी निकराची एक लढाई करून त्याचा अगदी मोड केला. ती लढाई आस्तलिट्स एथें डिसेंबर महिन्याचे दुसरे तारिखेस २७