पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ आजूनपर्यंत ब्रिटिश सरकार आपले संरक्षण होण्या करितां मात्र फौज जमवायाचा उद्योग करीत होते. परंतु त्यांचें अरमार शत्रूंस बंदरांस वेढे देऊन त्यांची लढाईची व व्यापाराची गलबतें बहुत धरीत असे. फ्रेंच सरकाराचा ब्रिटन बेटाच्या कांठावर येऊन हल्ला करण्याचा बेत हो- ता, आणि एकदा त्यांनीं ब्रिटन बेटाच्या समोरचे कांठावर तीन लाख फौज जमविली होती; परंतु रशिया व अर्मनी एथील सरकारांशीं तंट्यामुळे त्या फौजेंतून बहुत दुसरे ठिकांणी पाठविणे जरूर पडले; कारण कीं, बोनापार्ट याचे अतिशय लोभामुळे त्यास सर्वत्र शत्रू होते. त्यानें आपले बेत जर्मनी देशांत सिद्धीस नेण्याकरितां जाहीर केलें कीं, जर्मनी याचे संस्थानांवर व मुख्यत्वें बवेरिया, यावर कोणी जुलूम केला असतां मी त्याशीं लढाई करीन. व जे राजे मला मिळून आहेत, त्यांचें मी कधीं वाईट कर णार नाहीं. आस्त्रियन लोक या ताकिदीचा तिरस्कार करून सुमारें पंचावच हजार फौज घेऊन इन नदी उतरून बवे- रियन राज्यांत गेले. रशिया देशांतही तयारी चालि- ली. आस्त्रिया एथील फौज तीन लाखांवर होती, रशि या देशची एक लक्ष ऐशी हजार टिरोल एथील मिलि- शिया सुमारें वीस हजार इतकी होती. परंतु तीमध्यें बंदोबस्त नव्हता, व तिची तयारी होण्याचे पूर्वी फ्रेंच ल ढावयाचे प्रसंग आणीत, त्यामुळे त्या मोठ्या फौजेचा फार मोड होत असे.. फ्रेंच फौज सप्टेंबर महिन्याचे २५ वे व २६ वे ता ..