पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ पा- त्या ठिकाणी जाऊन राजा बसला. गारीचा आरोप सभेत ठेवावा. हा आरोप ठेवावयास सबब ही कीं, त्यांनी राज्याचे मूळ नियम, आणि रीति, यांचा नाश करावयाचा, राजाचा अख्यार बुडवायाचा आणि लोकांवर जुलूम करावयाचा उद्योग आरंभिला. ही अविचारी मसलत पाहून लोक नुकते विस्मय करीत होते; इतक्यांत यापेक्षा अधिक अविचाराची दुसरी एक झाली, ती त्यांचे दृष्टीस पडली. ती अशी कीं, दुसरे दिवशीं राजा स्वतः एकटा कामन्स यांचे सभेत चालला; • हुन ते सर्व सभासद याचा आदर करावयाकरिता उठून उभे राहिले. त्या सभेतील मुख्याने आपले स्थळ सोडिलें, मग कांहीं वेळपर्यंत सभोवतें पाहून त्यानें सभेस सांगितलें कीं, आज मला येथे येण्याचे अवश्यक कारण पडले ह्मणून मला वाईट वाटलें; तें कारण हें कीं, मी ज्यांवर सरकार गुन्हेगारी ठरविली; त्यांस तुह्मी स्वाधीन करणार नाहीं; ह्मणून मी त्यांस धरा- वयास एथें आलों. ते पुरुष तेथें होते कीं नाहीं हैं त्याने पाहिले; परंतु तो यावयाचे पूर्वी कांहीं वेळ ते पळून गेले होते. अशी निराशा झाल्यामुळे तो घाब- रून गेला, कोणावर विश्वास ठेवावा हे त्यास कळेना, असें होऊन तो कामनकौन्सिल यांत चालला, तो वाटेनें लो- कांनीं जुलूम जुलूम असा गोंगाट केला. तो कौन्सिल •याजवळ आपली गोष्ट सांगू लागला; परंतु त्यांनीं उगीच राहून त्याचा अपमान केला. मग तो निघून वाड्यांत जात असतां, एका दांडग्यानें लटले, "तुमच्या डेऱ्यांत चलावे, इस्राइल लोक हो.” जेव्हां याहुदी लोक आपले राजास सोडीत तेव्हां असें ह्मणत.