पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ केली. तसेच युरोप खंडांतील जे राजे किंचित् स्वतंत्र होते, त्यांनी तहांत कांहीं शाश्वतपणा नाहीं; असे समजून लढाईची तयारी केली. प्रशिया एथील दरबाराने मात्र आपणास फ्रेंच एंपरर, रशिया एथील दरबाराशी बोल- ण्यांत मध्यस्थी करील, अशा आशेने उदासीनपणा धरिला. परंतु ब्रिटिश सरकारास मध्यस्थीस घातल्यावांचून एकटे प्रशिया एथील सरकाराची मध्यस्थी रशिया कबूल करीना. बोनापार्ट यास तें मान्य नव्हतें, तथापि त्यानें संन् १८०५ चे सप्तंबर महिन्यांत ब्रिटिश राजास तहाचे बोलण्यावि- षयीं पत्र पाठविलें; त्याचें उत्तर राजाकडून लार्ड मलग्रेव यानें लिहिलें कीं, आपले स्नेही राजे यांशीं, व मुख्यत्वे रशिया एथील एंपरर याशीं मसलत केल्यावांचून या सर काराच्यानें आणखी कांहीं बोलवत नाहीं. गेले. त्या वेळेस नवे कांहीं फ्रेंच यांचे लोक इटला देशांत त्यामुळे भय पावून आस्त्रिया एथील सरकारानें त्याचें कारण विचारिलें; परंतु ते न सांगतां मार्च महिन्यांत बोनापार्ट यानें आपणास इटली देशचा राजा, असे जा हीर केले; परंतु सांगितले की, तेथून बाहेरच्या फौजा निघून गेल्यावर मी तेथील राज्य आपले मुलांतून कोणास तरी देईन. मग मे महिन्याचे २६ वे तारिखेस मिलन शह- रांत त्यानें मोठ्या समारंभानें तेथील मुकुट धारण केला; व जिनोआ आपले राज्यास मिळविले. यामुळे रशिया देशाशी तह करण्याचा कोणताही प्रकार नाहीं, असें झा- ल्यावर तेथें व आस्त्रिया देशांत लढाईची मोठी तयारी करण्याचा प्रारंभ झाला; व ब्रिटिश सरकाराने जितकी मदत होईल तितकी करण्याचा करार केला.