पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० दोन नद्या, जिनोआ, स्पोत्सिआ, व हेवर आणि सेन नदीवरची बंदरें वेढण्याचा हुकूम केला. आणि पुढे ब्रि- टिश फौजेनें सेंटलुशिया, डोबेगो, ङमरेरा, व एसि- विवो हीं बेटे, बर्विस एथील संस्थान, व सेंट्पियर व मि किलन हीं दूसरी बेटे घेतली. तसेच ग्रान्विल बंदर आणि डिएप, बलोन ही शहरें व किल्ले यांवर कित्येक वेळ हले केले, त्यांतही इंग्लिश यांचा जय झाला; व त्यांनी शत्रूचीं कित्येक गलबतेंही घेतली. मागले वर्षों फ्रान्स देशाचे राज्यांत फेरफार होऊन बोनापार्ट यास वंशपरंपरेनें त्या राज्याचा एंपरर असा किताब मिळून तो राज्य करूं लागला, व त्यानें आपले कुटुं- बांतील लोकांस प्रिन्स असा किताब देऊन दरबारांत पूर्व- वत् लहान मोठे किताबांचे लोक ठेविले. या फेरफारापा- सून फ्रेंच लोकांस फार संतोष झाला; व पूर्वीचे सर्वसत्ताक राज्याचें स्मरण कांही न राहून बोनापार्ट आपले मर्जी- प्रमाणे राज्य करूं लागला. इंग्लंड देशांत तेव्हां लढाईकरितां नवे जे कर बसविले होते, ते लोकांनी आपले संतोषानें दिले. तेव्हां कांहीं का रणामुळे आडिंग्तन साहेबानें मुख्य प्रधानाची जागा सो- डली, व त्या कामावर पिट साहेबास नेमिलें. पुढे आडिं- ग्तन साहेबास लार्ड सिमौथ असा किताब मिळून तो लार्ड सभेत गेला. संन् १८०४ चे अखेरीचे सुमारें स्पेन एथील दरबा- रानें ब्रिटिश सरकाराशी लढण्याची प्रतिज्ञा केली; ह्मणून प्रधानांनी त्यांचीं गलबतें धरण्याचे हुकूम दिले. ही युद्धा- ची प्रतिज्ञा स्पेन एथील सरकारानें बोनापार्ट याचे भयानें