पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ करून फांशीं दिलें. तें वर्तमान ऐकून पार्लमेंट सभेनें अयर्लंड एथे हेवियसकार्पस कायदा बंद केला. पुढे उघड फ्रान्स देशांत ब्रिटन वेट लुटून उद्वस्त करावें, अशा बेतानें लोकांस चाकरीस ठेवूं लागले, व पुढील बेतही प्रसिद्ध करूं लागले, ह्मणून लढाई करणें सर्व लो- Pj कांस जरूर वाटलें. 1. ह्मणून पूर्वीचे लढाईपेक्षां समुद्रांतील फौज दुप्पट असा- वी व मिलिशिया याचे लोक जमवावे असा हुकूम केला. दुसरी फौज जमवावयाचाही हुकूम केला. त्यामुळे ३०००० लोक अधिक जमले. राज्यांतील लढावयाजोगे लोकांस बोलावणे करून त्यांतून कितीएकांस लढाईकरितां तयार करावे, असाही राजास पार्लमेंट सभेनें अख्त्यार दिला होता. परंतु लोक आपणच लढावयास सिद्ध होत चा लले, त्यामुळे राजास हा अख्त्यार चालविणे जरूर पडलें नाहीं. प्रथम बोनापार्ट यास आपले पेक्षां ब्रिटिश सरकारचें सामर्थ्य कमी व आपले अधिक असे वाटले होते; परंतु आतां वास्तविक होतें तें त्याचे ध्यानांत आले. त्याने तीन हजार लोक समुद्रकांठावर जमवून समुद्रांत पाठवावयास तयार केले होते; परंतु बाहेर जाऊन हल्ला करणे, हे त्यास कठीण वाटून त्यानें, मौजेने किंवा कामामुळे जे इंग्लिश लोक फ्रान्स देशांत गेले होते त्यांस धरून कैद केलें; व लढाई चालू झाल्यानंतर पुढे सुमारे दोन महिन्यांनी ब्रिटिश राजाचा सूड उगवावयाकरितां त्याचें निराश्रित संस्थान हा नोवर एथे आपली फौज पाठवून तें लुटविलें. ही बातमी राजाने मोठ्या धैर्यानें ऐकिली, व एल्ब आणि वीझर या