पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ जमा केलीं. त्यांनी आपले साथी मंडळीस लढाईचें काम कांहीं शिकवून त्यांचे घरांत शस्त्रे, व बंदुकीची दारू ठेवून जेव्हां काम लागेल तेव्हां त्यांनीं चाकरीस हजीर व्हावें. असे केलें होतें. त्यांचा बेत असा होता की, डब्लिन एथील किला घ्यावा, लढाऊ शिपाई यांस कैद करावें, व आपणास जे कोणी मिलिशिया यांतील किंवा वालंटीर लोक अटकाव करितील त्यांस ठार मारावें, व डांकेच्या गाड्या बंद केल्या ह्मणजे लोकांनी चहूंकडून उठावें. असे करून त्या बंडास जुलै महिन्याचा २३ वा दिवस नेमिला. त्या दिवशीं प्रहर रात्रीचे सुमारे त्यांनी बाण जाळून खूण केली, व त्याचे कोठ्यांचीं दारे उघडतांच एम्मेट, डौ- डाल, क्विग्ली, व स्टाफोर्ड हे टामस स्लीट या गलींत गेले. प्रथम त्यांचे मंडळींत पत्रासांवर लोक नव्हते, परंतु जे येत त्यांस ते भाले देत असत, यामुळे ते लवकर सुमारें पांचशे जमले. त्या बंडवाल्यांतून कित्येकांनी तेथील माजिस्क्रेट लार्ड किल वार्डन यास एके सभेस लवाडीचें बोलावणें पाठ- विलें होतें. त्यास तें खरें वाटून तो आपली मुलगी व पुतण्या यांस बरोबर घेऊन घराहून, किल्ल्यास येत असतां वाटेनें बंडवाल्यांनी त्यास व त्याचे पुतण्यास गाडींतून ओ- ढून ठार मारिलें. त्याची मुलगी मात्र कांहीं उपाय करून किल्यास निघून गेली. कर्नल ब्रौन व दुसरे कित्येक आ पले पलटणींत जात होते, त्यांस धरून तुकडे तुकडे केले; व शिपाई आल्याचे पूर्वी बहुत लोक त्यांनी मारिले. शेवटी एम्मेट, डौडाल, क्विग्ली, व स्ताफोर्ड हे पळाले. पुढे लवकरच एम्मेट आणि रसेल यांस धरून चौकशी परंतु