पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७

  • करावा. या निरोपावरून दोनही सभांनी राजास संमति-

पत्रे पाठविलीं, व दुसरे १०००० लोक अरमारांत दिले. मार्च महिन्याचे १० वे तारिखेस सभांस दुसरा एक राजा- चा निरोप आला कीं, मिलिशिया बोलावून तयारी कर- ण्यास मी हुकूम दिला आहे. वर सांगितलेलें तहाचें वोलणें कांही वेळपर्यंत चालले होतें, परंतु शेवटी बंदोबस्त होण्याचा कांहीं उपाय नाहीं; असे झाल्यावर लार्ड व्हिट्वर्थ, मे महिन्याचे १० वे तारि- खेस पारीस शहरांतून निघून आला; व त्याच सुमारें फ्रेंच वकील आद्रिओसी लंडन शहरांतून गेला. हिन्याचे १८ वे तारिखेस ब्रिटिश सरकारानें फ्रान्स देशावर फिर्यादी होत्या त्या छापून प्रसिद्ध केल्या; व पुढे लवकरच फ्रेंच गलबतें धरण्याचे हुकूम पार्लमेंट सभेचे त्याच म- संमताने दिले. संन् १८०३ चे उन्हाळ्यामध्ये अयर्लंड बेटांत शत्रूस सामील जे लोक होते, त्यांनी बंड उत्पन्न केलें, तें वर्त- मान लढाईचे पूर्वी लिहितों. त्या बंडांत मुख्य एम्मेट, रसल, व डौडाल या नांवाचे विद्वान परंतु दांडगे व ल बाड असे तिघे पुरुष होते. त्यांमध्यें एम्मेट, व रसल, हे दोघे संन् १७९८ चे बंडांत होते; व लढाई नंतर सरकाराचे परमाणगीवरून देश सोडून फ्रान्स एथें जा- ऊन राहिले. तेथें ते आपला बंडाचा बेत करून संन् १८०२ मध्यें परत अयर्लंड एथे येऊन खोटे नांवावर राहिले. तशा स्थितीत त्यांस कित्येक तसेच मूर्ख लोक साथी मिळून त्यांनी डब्लिन शहरांत टामस स्त्रीट या नांवाच्या गलींतील एक घरांत भाले व दुसरी हत्यारें